ईराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिराब दोल्हाहियान सध्या भारत भेटीवर असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.
त्यांचे स्वागत करत, पंतप्रधानांनी भारत आणि ईराण यांच्यातल्या दीर्घकालीन नागरी आणि सांस्कृतिक संबंधाचे स्मरण केले. यावेळी दोन्ही देशांमध्ये द्वीपक्षीय सहकार्यातून सुरु असलेल्या उपक्रमांविषयी चर्चा झाली. कोविडनंतरच्या काळात, दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यास वेग द्यावा, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांना आपल्या शुभेच्छा कळवाव्या तसेच त्यांना लवकरात लवकर भेटण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगावे,असेही मोदी यांनी ईराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले.