तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाइलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल.
फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.”
देशभर के अपने किसान भाई-बहनों का जीवन आसान बनाने के लिए हमारी सरकार प्रतिबद्ध है। यह मेरे लिए सौभाग्य की बात है कि लगातार तीसरी बार प्रधानमंत्री के रूप में कार्यभार संभालने के बाद पहला काम उनके लिए ही करने का अवसर मिला है। इसके तहत पीएम किसान सम्मान निधि की 17वीं किस्त से जुड़ी… pic.twitter.com/YZQK3VCXIH
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2024