15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग आणि सदस्यांनी आज आपल्या आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी असलेल्या अहवालाची प्रत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केली. आयोगाने आपला अहवाल दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी राष्ट्रपतींकडे सादर केला होता.
अध्यक्ष श्री. एन.के.सिंग यांच्यासह आयोगाचे सदस्य श्री. अजय नारायण झा, प्रा.अनुप सिंग, डॉ. अशोक लाहीरी आणि डॉ. रमेश चंद आणि त्यांच्या सोबत आयोगाचे सचिव श्री. अरविंद मेहता या सादरीकरणाच्यावेळी उपस्थित होते.
आयोग आपला हा अहवाल उद्या केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर सादर करेल.
हा अहवाल त्यानंतर सदनातील पटलावर घटनेत सांगितल्याप्रमाणे) कृती अहवालाच्या स्वरूपात स्पष्टीकरणात्मक निवेदनासह मांडला जाईल.