प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहायता आणि मदत निधी (पीएम केअर्स) फंड ट्रस्टने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि कल्याणी येथे डीआरडीओच्या वतीने 250 बेड्स असलेली 2 तात्पुरती कोविड रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 41.62 कोटी रुपयांचे वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार आणि भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पायाभूत सहकार्य केले जाईल.
या प्रस्तावामुळे कोविडची स्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी पश्चिम बंगालमधील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळेल.
प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहायता आणि मदत निधी (पीएम केअर्स) फंड ट्रस्टने बिहार, दिल्ली, जम्मू आणि श्रीनगरमधील आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सहकार्य केले आहे.