महामहिम,

तुमची मैत्री, हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी कझानसारख्या सुंदर शहराला भेट देण्याची संधी मिळाली याचा मला आनंद झाला आहे. या शहराचे भारताशी घनिष्ठ  आणि ऐतिहासिक संबंध आहेत. कझानमध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरू झाल्यामुळे हे संबंध आणखी दृढ होतील.

 

|

महामहिम,

गेल्या तीन महिन्यांतील माझी ही दुसरी  रशिया भेट आपल्यातील घनिष्ठ समन्वय आणि गाढ मैत्री दर्शवते.जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या आपल्या  वार्षिक शिखर परिषदेमुळे प्रत्येक क्षेत्रात आपले  सहकार्य अधिक मजबूत  झाले आहे.

महामहिम,

गेल्या वर्षभरात ब्रिक्सचे यशस्वीपणे  अध्यक्षपद भूषवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.गेल्या पंधरा वर्षांत,ब्रिक्सने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता जगभरातील अनेक  देशांची यात सहभागी होण्याची इच्छा आहे.ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.

 

|

महामहिम,

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण  नियमित संपर्कात आहोत. मी आधी म्हटल्याप्रमाणे,समस्यांचे निराकरण शांततापूर्ण मार्गानेच व्हायला हवे यावर आमचा विश्वास आहे.शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुन्हा प्रस्थापित व्हावे याचे आम्ही समर्थन करतो.आमचे सर्व प्रयत्न मानवतेला प्राधान्य देतात. भविष्यातही भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

महामहिम,

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Rs 1,555 crore central aid for 5 states hit by calamities in 2024 gets government nod

Media Coverage

Rs 1,555 crore central aid for 5 states hit by calamities in 2024 gets government nod
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 फेब्रुवारी 2025
February 19, 2025

Appreciation for PM Modi's Efforts in Strengthening Economic Ties with Qatar and Beyond