श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, तुम्हाला भेटून नेहमीच खूप आनंद होतो. आज आपण दोघे आणखी एका सकारात्मक आणि उपयुक्त क्वाड शिखर परिषदेमध्येही सहभागी झालो.
भारत आणि अमेरिका यांची धोरणात्मक भागीदारी ही एक खऱ्या अर्थाने विश्वासार्ह भागीदारी आहे.
आपली सामायिक मूल्ये आणि सुरक्षेसहित अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या समान हितसंबंधांमुळे विश्वासाचे हे बंध अधिक मजबूत झाले आहेत.
आपल्या देशांमधील लोकांमधील ऋणानुबंध आणि घनिष्ठ आर्थिक संबंधही आपल्या भागीदारीला अव्दितीय करतात.
आपल्यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक यामध्येही सातत्याने विस्तार होत आहे. वास्तविक, आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांपेक्षा आत्ता तरी हा विस्तार खूपच कमी आहे.
मला विश्वास आहे की, आपल्यामध्ये ‘भारत-अमेरिका गुंतवणूक प्रोत्साहन करारा’ मुळे आपल्याला गुंतवणुकीच्या दिशेने ठोस प्रगती पहायला मिळेल.
आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपले व्दिपक्षीय सहकार्य वाढवत आहोत आणि वैश्विक मुद्यांवरही आपसामधली समन्वय दृढ करीत आहोत.
आपल्या दोन्ही देशांनी हिंद-प्रशांत क्षेत्राविषयीही समान दृष्टिकोन ठेवला आहे आणि केवळ व्दिपक्षीय स्तरावर नाही तर इतर समविचारी असलेल्या देशांच्या बरोबर आपण सामायिक मूल्ये आणि समान हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी काम करीत आहोत.
क्वाड आणि काल जाहीर आयपीईएफ याचे सक्रिय उदाहरण आहे. आज आपल्या चर्चेमुळे या सकारात्मक कामाला अधिक गती मिळेल.
मला विश्वास आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री, वैश्विक शांती आणि स्थिरता, वसुंधरेच्या शाश्वततेसाठी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी कायमची एक चांगली शक्ती असेल.