पंतप्रधान जी : हं, श्रीकांत सांगा!
श्रीकांत : सर, पहिल्यांदा तर खूप खूप धन्यवाद सर, आपण आपल्या एवढ्या महत्त्वाच्या वेळेतून वेळ काढून आमच्या सामन्यानंतर लगेच आपण आमच्या सर्वांसोबत फोनवर बोललात, सर आणि मला मोठ्या अभिमानाने सांगावसं वाटतं की जगातल्या कोणत्याही खेळाडूंना या प्रकारे प्रोत्साहन मिळत नाही. फक्त आम्हालाच जिंकल्यानंतर आपल्याशी ताबडतोब बोलता येते, असे भाग्य लाभते.
पंतप्रधान जी : अच्छा श्रीकांत, मला सांगा की तसंही बघितलं तर बॅडमिंटन आणि कर्णधार अशी जोडी लोकांच्या मनात काही लगेच स्थान मिळवत नाही. आता तुम्हाला कॅप्टन केलं आहे तेव्हा एवढी मोठी टीम आणि एवढं मोठं आव्हान, जेव्हा ही जबाबदारी घेण्याचे आव्हान आपल्या समोर उभे राहिले तेव्हा आपल्याला कसे वाटले आणि एवढे मोठे टार्गेट होते याबद्दल आपल्याला काय वाटले?
श्रीकांत : सर, फक्त एवढंच वाटलं की सगळेजण स्वतःचा खेळ खूप व्यवस्थित खेळत आहेत. सर, फक्त टीम इव्हेंट म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन जायचे आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्रित पणे खेळायचे आहे आणि शेवटपर्यंत झुंज द्यायची आहे. सर, बस एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सर, जे आम्ही सर्व खेळाडू मिळून चर्चा करून करू शकतो. फक्त हे एवढंच मला करावं लागलं सर. मला कर्णधार या नात्याने खूप काही मोठी गोष्ट करावी लागली नाही कारण प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा खेळ खूप चांगला आहे सर.
पंतप्रधान जी : नाही नाही सर्व जण व्यवस्थित खेळले हे तर खरेच पण हे काही सोपे काम नव्हते. आपण सगळे फार सोपे करुन सांगत आहात, कारण एका टप्प्यानंतर असे वाटत होते की गोष्ट सोपी आहे. जेव्हा क्रिकेट सामन्यात शेवटच्या षटकात सामना हातात आला असे वाटत असताना जसे कॅप्टनचा कस लागतो त्यासारखाच आपल्यावर काही ताण तर निश्चितच असणार.
श्रीकांत : सर, म्हणजे एक मोठी सुवर्णसंधी मला मिळाली, ती म्हणजे अंतिम सामना, तो पूर्ण सामना शेवटच्या जिंकून देणाऱ्या क्षणापर्यंत मी खेळू शकलो. जो सामना भारतीय चमूसाठी खूप महत्वाचा होता. अंतिम सामना, तो सामना माझ्यासाठी एक संधी होती मला त्याचा खूप चांगला उपयोग झाला मी फक्त एवढाच विचार करत होतो की पूर्ण प्रयत्न करून आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन मला खेळायचे आहे आणि कोर्टमध्ये ज्या वेळेला मी उतरलो तेव्हा एवढंच ठरवलं की मला 100% खेळायचे आहे आणि सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन खेळायचे आहे सर.
पंतप्रधान जी : अच्छा! आपण जागतिक मानांकनात पहिल्या स्थानावर आहात आणि आता थॉमस कप मध्येसुद्धा सुवर्ण पदक जिंकले आहे. खरंतर प्रत्येक यशाचे आपले एक वैशिष्ट्य असते त्यामुळे विचारायला तर नको पण ज्याप्रकारे पत्रकारांना सवय असते तसा एक प्रश्न विचारू की या दोन्ही गोष्टीत आपल्याला कुठलीही गोष्ट महत्त्वाची वाटते?
श्रीकांत : सर, ही दोन्हीही माझी स्वप्न आहेतच. सर, मला जगात पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवायचं आहे ते तर प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते ते म्हणजे जगात सर्वोत्तम स्थान मिळवणे आणि थॉमस कप ही अशी स्पर्धा आहे जी 10 खेळाडूंच्या एकत्रित संघाला सगळे मिळून एकच खेळाडू असल्यासारखी खेळायची असते. हे सुद्धा एक स्वप्न आहे सर. कारण, याआधी भारताने थॉमस कप मध्ये कधीही पदक जिंकलेले नाही आणि आम्हाला या वर्षी एक ही मोठी संधी होती कारण आम्ही सर्वचजण उत्कृष्ट खेळत होतो. तर ही दोन्ही स्वप्ने मी उराशी बाळगून होतो सर. आणि दोन्ही प्रत्यक्षात आली तेव्हा मला खूपच आनंद झाला सर.
पंतप्रधान जी : आधी थॉमस कप मध्ये आपण खूप मागे राहत होतो ही गोष्ट खरीच आहे. देशात याप्रकारे सामन्यांची चर्चा सुद्धा होत नव्हती. लोकांना एवढी मोठी स्पर्धा असते याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि म्हणून जेव्हा लोकांना हे कळले तेव्हा मी आपल्याला फोनवर हे बोललो होतो की कदाचित हिंदुस्तानातील लोकांना आपण काय मिळवले आहे हे समजून घ्यायला चार ते सहा तास लागतील. अच्छा श्रीकांत मी संपूर्ण देशाच्या वतीने आपल्याला आणि आपल्या या पथकाला खूप शुभेच्छा देतो कारण कित्येक दशकानंतर आपण भारताचा झेंडा फडकवलात ही काही छोटी गोष्ट नाही.
श्रीकांत : धन्यवाद सर!
पंतप्रधान जी : एक खेळाडू म्हणून आणि त्यातही एक कर्णधार म्हणून शेवटच्या क्षणाला किती ताण असेल याचा अंदाज मला व्यवस्थित लावता येतो. परंतु संपूर्ण संघाला धीर देत एकत्र घेऊन आपण देशाला ज्या प्रकारे गौरव मिळवून दिला आहे त्याबददल मी आपल्याला एकदा फोनवर शुभेच्छा तर दिल्या होत्याच पण पुन्हा पुन्हा आपल्याला धन्यवाद देऊन मला स्वतःलाच त्या आनंदाचा पुन्हा पुन्हा प्रत्यय घेता येतोय.
श्रीकांत : धन्यवाद सर!
पंतप्रधान जी: जरा खेळाच्या बाबतीत सांगा. आपला अनुभव, त्याबाबत बोला.
सात्विक : नक्कीच. सर, माझ्या जीवनात मागचे दहा दिवस खूपच संस्मरणीय होते. जसे आम्ही कोर्टमध्ये खेळतानाच नव्हे तर कोर्टच्या बाहेरही खूप उत्तमपणे संपूर्ण संघ अतिशय चांगल्या प्रकारे साथ देत होता. खुपच संस्मरणीय होतं हे सगळं. सपोर्ट स्टाफकडूनही भरपूर सपोर्ट मिळाला आणि इथून भारतातून सुद्धा खूप सपोर्ट मिळाला. त्यामुळे सर, मागील काही दिवसात खूप छान वाटत होते. आताही आम्ही लोकं तिथेच थायलंडमध्ये आहोत. शरीर आहे पण मन तिकडेच आहे. शेवटच्या क्षणी जसा श्रीकांत भाई होता तो क्षण अजूनही नजरबंद आहे. सर, आता तर आम्ही अजूनही ते क्षण एन्जॉय करत आहोत सर.
पंतप्रधान जी : रात्री कॅप्टन रागावल्याचे दिसत असेल.
सात्विक : सर, फायनल्सनंतर सर्वजण पदके घालूनच झोपले होते. कोणीही ती उतरवली नाहीत.
पंतप्रधान जी: मी कोणाचे तरी ट्विट पाहिले. बहुतेक प्रणयचे ट्विट पाहिले असावे. तो पदक घेऊन बसला आहे आणि म्हणतो आहे की मला झोपच येत नाही. उत्तम खेळल्यानंतर आपण व्हिडिओ बघून कुठे कमी पडलं वगैरे दोघं मिळून व्हेरिफाय करून घेता..
सात्विक : हो सर, प्रशिक्षकाबरोबर बसून मॅचच्या आधी उद्या ज्याच्याबरोबर खेळायचे आहे त्याच्या खेळाचे पूर्णपणे विश्लेषण करून खेळायला उतरतो सर.
पंतप्रधान जी: चला तर. सात्विक, आपल्या यशाने आपले प्रशिक्षक बरोबर होते एवढंच फक्त सिद्ध केलं नाहीत पण आपण स्वतः सुद्धा एक खूप चांगले खेळाडू आहात हे सिद्ध केलं आहे. आणि जो आपल्या स्वतःचा खेळ आवश्यकतेच्या प्रमाणात सुधारत जातो, त्यामध्ये परिवर्तन आणतो आणि बदल करणे आवश्यक असेल तर ते स्वीकारतो तेव्हाच त्याला यश मिळते आणि आपण तो बदल स्वीकारला असेल, स्वत:मध्ये विकास घडवून आणण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असतील त्या स्वीकारल्या आहेत आणि आज त्याचा परिणाम दिसतो आहे. देशाला आपला अभिमान आहे. माझ्याकडून आपल्याला खूप शुभेच्छा. आपल्याला यापुढेही खूप काही करायचे आहे. एवढ्यात थांबायचे नाही. असेच सर्वशक्तीनिशी एकत्र राहा. खूप खूप शुभेच्छा.
उद्घोषक : चिराग शेट्टी
पंतप्रधान जी : बघा चिराग. सात्विकने तुमची खूप तारीफ केली आहे.
चिराग शेट्टी : सर, नमस्ते सर. पहिली गोष्ट तर मला सांगावसं वाटतं की माझ्या अजूनही सर हे लक्षात आहे की आम्ही गेल्या वर्षी इथे आलो होतो. आपण आम्हाला ऑलिम्पिकनंतर बोलावलं होतंत. आम्ही 120 खेळाडू होतो. आणि सर्वांना आपण आपल्या घरी बोलावलं आणि ज्यांनी पदक जिंकलं नव्हतं ते सुद्धा आले होते. तेव्हा आम्ही देशासाठी पदक जिंकू शकलो नव्ह्तो याचं आम्हाला खूप वाईट वाटत होतं, पण आता यावेळी जेव्हा मी थॉमस कप खेळण्यासाठी गेलो आमच्यावर एक भूत स्वार झालं होतं की काय कसली उमेद होती हे काही माहित नाही पण हे पक्कं होतं की काही ना काही करून एक पदक तर नक्की घेऊन यायचे आहे. अर्थाच ते सुवर्ण पदक असेल याची शक्यता आम्ही विचारात घेतली नव्हती. पण कोणते ना कोणते पदक नक्कीच घेऊन यायचा हा विचार होताच. तेव्हा मला वाटतं याहून मोठा आनंद आम्ही आपल्या देशाला देऊ शकत नाही. ही एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते सर.
पंतप्रधान जी : बघा तेव्हा आला होतात, त्यावेळी मी बघत होतो की तुमच्यापैकी काही लोकांचे चेहरे अगदी पडलेले होते. काय हे! आपण तर पदक न जिंकता आलो आहोत असं काहीसं तुमच्या मनात घोळत होते. परंतु त्या दिवशी सुद्धा मी म्हटलं होतं की आपण तिथपर्यंत पोहचलात हेसुद्धा एक पदकच आहे. त्या दिवशी मी सांगितले होते आणि आज आपण हे सिद्ध केलंय की पराजय म्हणजे फकत पराजय असे नाही. जीवनात यशासाठी फक्त उमेद पाहिजे, जोश पाहिजे, यश कधी कधी समोर येऊन तुमच्या पायाशी उभे राहते आणि आपण ते सिद्ध करून दाखवलेत. अच्छा, चिराग मी आपल्या मित्राला तर आधी विचारुन घेतलं आणि त्यांनी सांगितलं पण आपल्या दोघांची जोडी मला माहिती आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या मनात एक प्रकारची उदासीनता वास करत होती पण आज आपण त्याची व्याजासहित भरपाई केलीत, देशाची शान वाढवलीत. एक टीम म्हणून आपण प्रयत्न केलेत. मला वाटते की आपण स्वतः हे कसे काय साध्य असेल, कारण ऑलिम्पिक मधील निराशेला काही फार काळ लोटलेला नाही. एवढ्या कमी वेळात कुठली उमेद आपण मिळवलीत की आपण विजयश्री मिळवून परतला आहात.
चिराग शेट्टी : सर, मुख्य बाब तर ही होती कि ऑलिम्पिकमध्ये मी सांगितले तसे आम्हाला अतिशय वाईट वाटत होते. कारण आम्ही ज्यांना हरवले त्यांनाच शेवटी जाऊन सुवर्णपदक मिळाले आणि एकाच गेम मध्ये ते आमच्याकडूनच हरले होते इतर कोणाकडून नाही. यावेळी काही नेमके उलटे झाले, प्री क्वार्टर फायनल ग्रुप स्टेजमध्ये आम्हाला त्यांच्याकडून हार खावी लागली आणि पुढे जाऊन आम्ही सुवर्णपदक जिंकले. तर ही एक गोष्ट अतिशय चांगली झाली. याला नशीबाचा खेळ म्हणा की दुसरं काही म्हणा, पण आमच्यात अक्षरशः एक जोश संचारला की काहीना काही मिळवायचं आहे आणि हा फक्त माझ्याच मनात नाही तर जे इतर दहा लोक इथे बसले आहेत ते आम्ही सर्व कितीही वाईट प्रसंग असो की इतर काही असो आम्ही सदैव एकत्र होतो आणि मला वाटते की हे दहाजण आपल्या भारताच्या लोकांना खरोखर दाखवून देत आहोत की काहीही झाले तरी आम्ही झुंज देणार.
पंतप्रधान जी : वा! चिराग आपल्याला आणि आपल्या संपूर्ण संघाला मी म्हणेन की अजून खूप पदके आणायची आहेत. खूप खेळायचे आहे, खूप बहरायचे आहे आणि देशाला खेळाच्या दुनियेत ओढून घेऊन जायचे आहे कारण आता भारत मागे राहू शकत नाही. त्याशिवाय मला असेही वाटते की आपण एका पुढे एक असे यश मिळवत आहात, देशाच्या पुढील पिढीला खेळासाठी प्रेरणा देत आहात हीच एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर माझ्याकडून आपल्याला खूप शुभेच्छा मित्रा.
चिराग शेट्टी : खूप खूप धन्यवाद सर
उद्घोषक : लक्ष्य सेन
पंतप्रधान जी : चला लक्ष्यचे तर मी पहिल्यांदा आभार मानतो. कारण मी त्याला टेलिफोन वर शुभेच्छा देताना म्हटले होते की भाई तुझ्याकडून तर बाल-मिठाई खाणार आणि ते लक्षात ठेवून तो आज ती घेऊन आला आहे.
लक्ष्य सेन : नमस्ते सर. मी युवा ऑलिम्पिकमध्ये जेव्हा सुवर्णपदक जिंकलं होतं तेव्हा आपल्याशी भेट झाली होती आणि आज दुसऱ्यांदा भेटतो आहे. तेव्हा मला हेच सांगावेसे वाटते की मी असेच म्हणेन की जेव्हा जेव्हा आपण भेटता तेव्हा आम्हाला खूप मोटिवेटेड झाल्यासारखे वाटते. त्या फोन कॉलनंतर सुद्धा आणि जेव्हा केव्हा भेटता तेव्हा मला असेच वाटते की मी भारतासाठी अशीच पदके जिंकत राहावीत आणि आपल्याला भेटत राहावे, बाल मिठाई आणत रहावे.
पंतप्रधान जी : अच्छा लक्ष्य, मला समजले की तुम्हाला तिथे अन्न विषबाधा झाली होती.
लक्ष्य सेन : हो सर. जेव्हा मी तिथे पोहोचलो त्या दिवशी मला अन्न विषबाधा झाली होती. दोन दिवस मला खेळता आले नाही पण त्यानंतर हळूहळू समूहाचे, ग्रुप स्टेजचे सामने सुरू झाले तोपर्यंत थोडे बरे वाटू लागले होते तेव्हा मी एक सामना खेळलो. एका सामन्यानंतर थोडी विश्रांती घेतली त्या अन्नविषबाधेमुळे.
पंतप्रधान जी : काहीही खाण्याची सवय म्हणून की काय
लक्ष्य सेन: नाही सर ते विमानतळावर काही चुकीचं खाल्ल गेलं त्यादिवशी. तर त्यामुळे कदाचित थोडासं पोट बिघडलं होतं पण बाकी सर्व जेव्हा स्पर्धेसाठी पुढे गेले आणि दिवसभरात म्हणजे एका दिवसानंतर मला जसं एक-एक दिवस जाईल तसे बरे वाटत गेले.
पंतप्रधान: तर आज देशात लहान लहान मुलांना देखील जावसं वाटतं. तर 8-10 वर्षांच्या मुलांसाठी तुमचा संदेश काय असेल?
लक्ष्य सेन : हो, ज्याप्रमाणे विमल सरांनी सांगितलं की मी अतिशय खोडकर होतो, तर मी स्वतःबद्दल तर हे सांगू इच्छितो की जर मी थोड्या कमी खोड्या केल्या असत्या आणि खेळावर जास्त लक्ष दिलं असतं, तर चांगलं झालं असतं. पण इतर लोकांना मी हेच सांगू इच्छितो की जे काही तुम्ही कराल ते मनापासून करा आणि पूर्ण लक्ष देऊन करा.
पंतप्रधान - अन्नातून विषबाधा झाल्यावर शारीरिक त्रास तर झालाच असेल, पण मानसिक त्रास देखील खूपच झाला असेल. कारण खेळ सुरु असेल, शरीर साथ देत नसेल, अशा वेळी जे संतुलन तू ठेवलं असेल न, कधी तरी शांतपणे विचार कर की ती कुठली शक्ती होती, ते कुठलं प्रशिक्षण होतं की अन्नातून विषबाधा झाल्यामुळे शारीरिक अशक्तपणा असूनही खेळ तुला शांत बसू देत नव्हता. आणि तू अन्नातून झालेल्या विषबाधेवर मात केलीस. तो क्षण पुन्हा एकदा आठव, तुझी खूप मोठी शक्ती असेल जे तू केलं असशील. दहा लोकांनी म्हटलं असेल, चिंता करू नकोस, सगळं झालं असेल, पण तुझ्यात देखील एक शक्ती असेल. आणि मला असं वाटतं आणि दुसरी गोष्ट, तुझा हा जो खोडकरपणा आहे न, हा सोडू नकोस, ती तुझ्या आयुष्यातली ताकद देखील आहे. हे पुरेपूर जागून घे, मस्तीत जागून घे. चल, खूप खूप अभिनंदन.
तर प्रणय, सांग मी खरं बोललो न, तुझंच ट्वीट होतं न.
प्रणय – हो सर, माझंच ट्वीट होतं, सर. सर, तो आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण होता, कारण आपण 73 वर्षांनंतर आपण थॉमस चषक जिंकला आणि मला याचा अधिकच अभिमान आहे, कारण आम्ही आपल्या देशसाठी, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशासाठी हा विजय मिळवला. म्हणून मला वाटतं की ही देशासाठी एक मोठी भेट आहे आणि मी खूप आनंदी आहे.
पंतप्रधान – अच्छा प्रणय, मलेशिया, डेनमार्क असे असे चमू आहेत. आणि त्याच्या वाईट उपउप्यांत आणि उपांत्य फेरीत निर्णायक सामन्यात जिंकण्याची भिस्त आणि मी समजू शकतो की त्या वेळी सर्वांचं लक्ष प्रणयवर असेल, काय होत असेल. त्या दडपणात स्वतःला कसं सांभाळलं आणि कसा आक्रमक निकाल दिला.
प्रणय – सर, खूप जास्त दडपण होतं, सर, त्या दिवशी. विशेषकरून उपउप्यांत फेरीच्या दिवशी. कारण मला माहित होतं की जर मी हा सामना हरलो, तर आपल्याला पदक मिळणार नाही आणि लोकांना पदकाशिवाय परत जावं लेगेल. पण जी ती सांघिक भावना होती सर, संपूर्ण स्पर्धेत आणि सर्वांचा जो जोश होता, की काहीही करून आपल्याला पदक घेऊनच जायचं आहे, तो सुरवातीच्या दिवसांत खूप उर्जा देत होता, पूर्ण पथकाला आणि विशेष करून सामना खेळायला लागलं की दहा मिनिटांनी मला वाटलं की आज तर काहीही झालं तरी जिंकायचंच आहे आणि मला वाटतं उपांत्य फेरीत देखील हीच परिस्थिती होती, सर. खूपच जास्त दडपण होतं कारण मला माहित होतं की जर आम्ही लोक अंतिम फेरीत पोचलो, तर आम्हो सुवर्ण पदक घेऊन येऊ शकतो. तर मला फक्त ते जिंकायचं होतं सर. आणि पुनर चमूसाठी आभार सर. कारण ते लोक तिकडे होते खेळण्यासाठी आणि खूपच जास्त उर्जा दिली त्यांनी.
पंतप्रधान – हे बघ प्रणय, मी बघतो आहे, तू योद्धा आहेत. खेळापेक्षाही जास्त तुझ्यात जी एक जिंकण्याची वृत्ती आहे ना, ती तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आणि कदाचित तू शरीराची काळजी न करता, दुखापत होईल, तर होऊ दे, काहीही झालं तरी होऊ दे, याचाच हा परिणाम आहे की तुझ्यात इतकी उर्जा देखील आहे आणि भावना देखील आहे. माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन.
प्रणय – अनेक आभार सर.
उद्घोषक – उन्नति हुडा
पंतप्रधान – उन्नति, सर्वात लहान आहे का?
उन्नति – गुड इवनिंग सर.
पंतप्रधान – बोल उन्नति
उन्नति – सर, सर्वप्रथम, मी या सगळ्याचा भाग असल्यामुळे आणि आज इथे उपस्थित असल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. आणि सर, माल एक गोष्ट खूप प्रेरित करते की आपण कधीच पदक जिंकणारे आणि पदक न जिंकणारे यांच्यात भेदभाव करत नाही.
पंतप्रधान – वाह रे वाह! अच्छा इतक्या लहान वयात मोठ्या वरिष्ठ लोकांच्या चमूत जाणं आणि तुमची चमू ऑलिंपीक विजेता पण आहे. तर, तुला मनातून काय वाटत होतं. अशीच घाबरून जायची की, नाही नाही मी पण समान आहे, काय वाटत होतं.
उन्नति – सर, या स्पर्धेत काही अनुभव मिळाले आणि खूप काही शिकायला देखील मिळालं. आणि मुलांची चमू जिंकली आहे आणि चांगलं वाटत आहे आता असा विचार केला आहे की पुढल्या वेळी मुलींच्या चमूला देखील जिंकायचं आहे आणि पदक आणायचं आहे.
पंतप्रधान – अच्छा मला हे सांग या हरियाणाच्या मातीत असं काय आहे जे एकापेक्षा एक उत्तम खेळाडू तयार होत आहेत.
उन्नति – सर, पहिली गोष्ट सांगायची तर दुध – दही खाणं.
पंतप्रधान – उन्नति, मला आणि संपूर्ण देशाला खात्री आहे की तू तुझं नाव नक्कीच सार्थक करशील. इतक्या लहान वयात तुला संधी मिळाली आहे, तू याला सुरवात समाजशील. खूप काही करायचं अजून बाकी आहे. कधीही, चला इकडे जाऊन येऊ, हे जिंकून येऊ, असं हा विजय डोक्यात जाऊ देऊ नकोस. खूप काही करायचं आहे, कारण तुला, तुझ्याकडे खूप मोठा वेळ आहे आणि कमी वयात तुला अनुभव मिळाला आहे. आणि म्हणूनच हे यश पचवून पुढे जाणं, या दोन गोष्टी तुझ्या खूप कामात येतील. आणि मला पूर्ण खात्री आहे की तू हे करशीलच. माझ्याकडून तुला अनेक शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन.
उन्नति – धन्यवाद, सर.
जे जजा - Good Evening Sir.
पंतप्रधान – जे जजा
जे जजा – एक तरुण खेळाडू म्हणून भारतासाठी खेळणं हा एक सन्मान आहे. येत्या वर्षात आणखीन पदकं जिंकून मी भारताचा मान वाढवेन.
पंतप्रधान – कुटुंबाची मदत कशी असते.
जे जजा – सर, बाबा आधी क्रीडा शिक्षक होते, त्यामुळे ते आधीच क्रीडा क्षेत्रात आहेत. म्हणून ते मदत तर करतीलच चांगल्या प्रकारे बॅडमिंटन खेळण्यासाठी, आधी घरी, कोर्टवर, त्यांनी घरीच कोर्ट बनवलं, मग घरी सराव केला. या नंतर राष्ट्रीय स्पर्धा, राज्य स्तरीय वगैरे पदकं मिळवली. मग अशी आशा वाटायला लागली की मी भारतीय संघात जाऊ शकते, असं आहे.
पंतप्रधान – तर तुझ्या कुटुंबात सगळ्यांना समाधान आहे.
जे जजा – हो सर, खूप आहे सर.
पंतप्रधान – वडील तुझ्यासाठी मेहनत करत होते, आता ते समाधानी आहेत.
जे जजा – हो.
पंतप्रधान – वाह, बघ जजा, ज्या प्रकारे तुम्ही सगळे उबेर कपमध्ये खेळलात त्यावरुन मी असं नक्की म्हणू शकतो की देशाला तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि तुम्ही पुढेही असेच तुमच्या लक्ष्यावर टिकून रहा. असं होऊ शकतं की एखादेवेळी आपल्या मनासारखा निकाल लागत नाही. मात्र, मला पूर्ण विश्वास आहे, की आज आपण ज्या परिणामांची इच्छा बाळगतो, त्याच्यासाठी मेहनत घेतो, ते परिणाम आपल्याला पुढे नक्की मिळतात. तुला मिळणार आहे, तुझ्या संघाला मिळणार आहे. आणि यापुढे कोणताही संघ आला तरी ती चांगलाच निकाल आणेल, कारण की तुम्ही एक उत्तम सुरुवात केली आहे. आपण देशातल्या युवा पिढीला नवा उत्साह, नव्या ऊर्जेने भारुन टाकलं आहे. आणि या गोष्टीसाठी आपल्या एवढ्या मोठ्या सव्वाशे कोटींच्या देशाला सात दशके वाट बघावी लागली. सात दशके म्हणजे खेळाडूंच्या न जाणे किती पिढ्या. ज्यांनी बॅडमिंटनला आपले स्वप्न मानले होते ते स्वप्न तुम्ही पूर्ण केले आहे. ही काही छोटी गोष्ट नाही. आणि जेव्हा अंतिम फेरीच्या सामन्यात मी जजाशी बोललो होतो, तिथे आणि मला जाणवलं होतं की तुम्हाला अंदाजच नव्हता की तू किती मोठं काम केलं आहे. आणि म्हणूनच मी सारखं सारखं सांगतो खरोखरच तुम्ही खूप मोठं काम केलं आहे. आणि आता तर तुम्हला देखील जाणवत असेल की हो यार, काही तरी करून आलो आहोत.
तुम्ही ज्या खेळांशी संबंधित आहात त्यात जेव्हा इतकं मोठं यश मिळतं तेव्हा भारताची जी क्रीडा व्यवस्था आहे, क्रीडा संस्कृती आहे त्यात नव्या उत्साहाची गरज आहे, जो एक आत्मविश्वास गरजेचा आहे, जे चांगले चांगले प्रशिक्षक करू शकले नाही, मोठमोठे नेते चांगलं भाषण देखील करू शकत नाहीत, ते काम तुमच्या या विजयानं करून दाखवलं आहे. ठीक आहे, या उबेर चषकात अजून थोडं काही करायचं आहे, वाट बघू, मात्र जिंकण्याची सोय देखील करू. आणि मला विश्वास आहे की फार काळ वाट बघावी लागणार नाही कारण जे तुम्ही लोक जाऊन आलात ना, तुमच्या डोळ्यात मला ती भावना दिसते आहे. आणि आपल्या महिला चमूने वेळोवेळी दाखवून दिलं आहे की त्या किती उच्च दर्जाच्या खेळाडू आहेत, किती उच्च दर्जाच्या ॲथलीट आहेत. आणि हे मी हे स्वच्छपणे बघू शकतो मित्रांनो, केवळ वेळेचा प्रश्न आहे, यावेळी नाही तर पुढच्या वेळी. तुम्हीच जिंकून येणार आहात.
आणि जसं तुम्ही सर्व म्हणाले, की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु आहे, स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत, आणि आपल्या डोळ्यादेखत क्रीडा जगतात भारताचा हा उदय खेळाच्या मैदानातून येणारा तरुण जागतिक मंचावर आपली शक्ती दाखवतो आहे, तेव्हा भारताची छाती अभिमानानी भरून येते. यशाची ही शिखरं सर करणं प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीसाठी अभिमानास्पद आहे. आणि म्हणूनच एका नव्या आत्मविश्वासानं, भारताचा स्वभाव आहे – होय, मी हे करू शकतो – हा स्वभाव आहे. आणि जसं प्रणय म्हणाला होता, तेव्हा मी मनातल्या मनात ठरवलं, यावेळी हरायचं नाही, मागे हटायचं नाही.
हे जे – हो, आम्ही हे करू शकतो, जे आहे नं, ही भारताची नवी ताकद बनली आहे. आणि तुम्ही त्यांचे प्रतिनिधित्व कात असता. अच्छा समोरचा प्रतिस्पर्धी कितीही शक्तिशाली असो, प्रतिस्पर्धी आपला कितीही शक्तिशाली असो, तो कोण आहे, त्याचा इतिहास काय आहे, या पेक्षा महत्वाचं आहे, आजच्या भारतासाठी स्वतःची कामगिरी, मला असं वाटतं. आपलं लक्ष्य गाठायचं आहे, हीच भावना ठेऊन आपल्याला पुढे जात राहायचं आहे.
पण, मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्हा सर्वांकडून स्वाभाविकपणे देशाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देश तुमच्याकडे जरा जास्त अपेक्षेने बघेल, दडपण येईल. आणि दडपण येणं वाईट नाही. मात्र या दडपणाखाली दाबून जाणं वाईट असतं. आपण हे दडपण उर्जेत रुपांतरीत कारायचं आहे, आपल्या शक्तीत रुपांतरीत करायचं आहे. त्याला आपलं प्रोत्साहन समजलं पाहिजे. जर कोणी बकअप, बकअप, बकअप म्हणत असेल तर त्याचा अर्थ हा नाही की तुमच्यावर दडपण आणतो आहे. तो बकअप, बकअप म्हणतो आहे याचा अर्थ आहे, की यार, आणखी वेगानं करू शकतोस तर तू कर. त्याला आपण आपल्या शक्तीचा एक स्रोत समजलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की तुम्ही हे करून दाखवाल.
गेल्या काही वर्षांत जवळपास प्रत्येक क्रीडा प्रकारात भारताच्या तरुणांची कामगिरी उत्तम राहिली आहे. आणि काही ना काही नवीन, काही ना काही चांगलं, काही ना काही जास्त करण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यातही गेल्या सात - आठ वर्षांत भारताने अनेक नवे विक्रम बनविले आहेत. आपल्या युवकांनी चांगली कामगिरी केली आहे. ऑलिंपिक्स असो, पॅरालिंपीक्स असो, विक्रमी कामगिरी केल्या नंतर. आज मी सकाळी कर्णबधीर ऑलिंपिक्सच्या लोकांना भेटलो. इतकी चांगली कामगिरी करून आली आहेत आपली मुलं. म्हणजे एकदम मनाला समाधान मिळतं, आनंद होतो.
आज खेळांसंबंधीच्या जुनाट कल्पना बदलत आहेत, आपण सगळे म्हणालात त्याप्रमाणे. आई - वडील देखील आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, मदत करत आहेत. आई - वडलांची देखील महत्वाकांक्षा तयार होत आहे, की हो, मुलं या क्षेत्रात पुढे जावीत. तर एक नवी संस्कृती, नवीन वातावरण आपल्याकडे तयार झालं आहे आणि हा भारताच्या, भारताच्या क्रीडा इतिहासात मला असं वाटतं की सोनेरी अध्याय आहे आणि ज्याची रचना तुम्ही सर्वांनी केली आहे, तुमच्या पिढीचे जे खेळाडू आहेत जे आज हिंदुस्तानला नव्या नव्या ठिकाणी विजय ध्वज घेऊन पुढे नेण्याचं कारण बनत आहे.
हा वेग आपल्याला असाच ठेवायचा आहे, बस, यात कुठेच ढिलाई येऊ द्यायची नाही. मी तुम्हाला विश्वास देतो की सरकार तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालेल, तुम्हाला शक्य ती सर्व मदत करेल, जिथे प्रोत्साहन देण्याची गरज असेल तिथे देईल. इतर व्यवस्थांची जी काही गरज असेल ती देखील पूर्ण करेल. आणि फक्त मी, माझ्या समोर तुम्ही लोक बसले आहात, पण देशभरातल्या खेळाडूंना मी विश्वास देऊ इच्छितो. आता आपल्याला थांबायचं नाही, आता मागे वळून बघायचं नाही. आपल्याला पुढेच बघायचं आहे, ध्येय ठरवून जायचं आहे आणि विजयी होऊनच परत यायचं आहे. माझ्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा .
अनेक अनेक धन्यवाद!