भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये ‘सार्क’ हा महत्वाचा विषय असून, सार्क राष्ट्रांमध्ये भारत सर्वात मोठा देश आहे. त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या विचार केला तर, अतिशय महत्वपूर्ण देश आहे. सत्तेवर आल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे शेजारी सार्क देशांबरोबर अधिक चांगले संबंध कसे प्रस्थापित होतील, याचा विचार परराष्ट्र धोरण ठरवताना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सार्क नेत्यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझाई, बांगलादेशचे सभापती शरमिन चौधरी, पंतप्रधान शेख हसिना, भूतानचे पंतप्रधान तशरिंग तोबगाय, मालदिवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्सा, हे सगळे उपस्थित होते. श्पथविधीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी या सर्व नेत्यांशी अतिशय महत्वपूर्ण विषयांवर व्दिपक्षीय चर्चा केली. यावरूनच सार्क देशांशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधानांनी नवे पर्व सुरू केल्याचे सूचित होते.
पंतप्रधान म्हणून परदेश भेटीवर पहिल्यांदा जाण्यासाठी मोदी यांनी भूतानची निवड केली. 15जून 2014 रोजी त्यांनी भूतानला भेट दिली. तिथे त्यांचे खूप प्रेमाने स्वागत झाले आणि त्यांनी यावेळी अनेक महत्वपूर्ण विषयांवर करार केले. या भेटीत त्यांनी भूतान संसदेमध्ये भाषणही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये काठमांडूच्या भूमिवर उतरले, त्यावेळी नेपाळ आणि भारत यांच्यातील नव्या पर्वाला प्रारंभ झाला. 17 वर्षांमध्ये प्रथमच भारतीय पंतप्रधान नेपाळ भेटीवर गेले होते. नेपाळमध्ये पंतप्रधानांनी व्दिपक्षीय चर्चा आणि महत्वपूर्ण करार करण्यावर भर दिला. यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये नेपाळमध्ये सार्क शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मोदी यांनी नेपाळला भेट दिली. यावेळी सार्कच्या शिखर नेत्यांची त्यांनी भेट घेतली.
फेब्रुवारी 2015 मध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष म्हणून नव्याने निवडून आलेले सिरिसेना भारत भेटीवर आले. जानेवारी 2015 मध्ये त्यांनी श्रीलंकेची सत्तासुत्रे स्वीकारली होती, त्यानंतर पहिलाच परदेश दौरा करण्यासाठी त्यांनी भारताची निवड केली. मार्च 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेला भेट देवून उभय देशात झालेल्या अनेक करारांवर स्वाक्षरी केल्या. श्रीलंकेच्या संसदेमध्ये मोदी यांनी भाषणही केले आणि जाफनाला भेट दिली. जाफनाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान तसेच दुसरे जागतिक नेते ठरले. जाफनामध्ये त्यांनी घरकूल प्रकल्पातील घरकूले सुपूर्द केली आणि जाफना सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी केली.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी मे 2015 मध्ये भारताला भेट दिली. दोन्ही देशांनी संबंध अधिक दृढ करण्याचे निश्चित केले.
भारत- बांगलादेश सीमा कराराला मान्यता देवून भारतीय संसदेमध्ये मे 2015 मध्ये नवीन इतिहास रचला. भारत- बांगलादेश यांच्यातील संबंधाचे नवे पर्व सुरू झाले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राजकीय पक्षांनी निभावलेल्या भूमिकेचे कौतुक केले. पंतप्रधान शेख हसिना यांच्या कडूनही शुभेच्छा आल्या. तसेच पंतप्रधान मोदी यांनी लवकरच भेट द्यावी, त्यांच्या भेटीसाठी उत्सूक असून हे संबंध अधिक दृढ होतील, असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
याप्रमाणे व्दिपक्षीय बैठकीमध्ये महत्वाचे विविध करार करण्यात आले. नरेंद्र मादी यांनी सार्क देशांशी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी जे काही शक्य होते ते सर्वकाही केले.