"... सर्रास चालणारा भ्रष्टाचार आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा या पार्श्वभूमीवर श्रीमती इंदिरा गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायची तयारी दर्शवली राष्ट्रपतींनी तो स्विकारला आणि ..."ही २५ जून १९७५ ची बातमी असायला हवी होती, मात्र तसे काही झाले नाही. उलटपक्षी, श्रीमती गांधी यांनी कायदा झुगारण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या लहरीप्रमाणे तो वळवला. आणीबाणी लागू करण्यात आली आणि दुर्दैवाने भारताला २१ महिन्यांच्या अंधार युगात ढकलण्यात आले. माझ्या पिढीच्या बहुतांश लोकांना आणिबाणीबाबत पुसटशी कल्पना असेल, याला कारण आपली इलेक्ट्रॉनिक माध्यमे, ज्यांना आणीबाणीच्या वर्धापनदिनी  त्या काळात सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेसने सत्तेचा कशा प्रकारे गैरवापर केला हे लोकांना कळावे  यापेक्षा "कार्यकर्ते " चित्रपट अभिनेत्यांच्या मुलाखती घेणे अधिक महत्वाचे वाटते.

श्रीमती गांधी यांच्या हुकूमशाही राजवटीविरुद्ध अनेक व्यक्ती आणि संघटनांनी आपले संपूर्ण जीवन लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी वेचण्याचा निर्णय घेतला त्यांची नावे इतिहासात कशा प्रकारे हरवली याची नोंद घ्यायला हवी. खरे तर, स्वातंत्र्य चळवळीनंतर, हा सर्वात मोठा लढा होता ज्यात,सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेसच्या राजवटीला शह देण्यासाठी राजकीय आणि बिगर-राजकीय शक्ती एकत्र आल्या. आज नानाजी देशमुख, जयप्रकाश नारायण, नाथालाल झगडा, वसंत गजेंद्रगडकर, प्रभुदास पटवारी सारख्या लोकांनी जनतेला (ही यादी खूप मोठी आहे ) एकत्र आणले त्यांची आठवण काळाच्या ओघात पुसट होत चालली आहे. ते आणीबाणीचे फारशी प्रसिद्धी न मिळालेले नायक होते. यासाठी पुन्हा एकदा "धर्मनिरपेक्ष "माध्यमांचे आभार. 

यामध्ये गुजरातने देखील महत्वाची भूमिका पार पाडली आणि खरे तर, आणीबाणीला विरोध करणाऱ्या अनेकांसाठी ते आदर्श बनले. गुजरातच्या नवनिर्माण चळवळीने काँग्रेसला कळून चुकले कि किमान गुजरातमध्ये तरी त्यांची सत्तेची लालसा फार काळ चालणार नाही. मोरबी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे वसतिगृहाच्या जेवणाच्या बिलातील वाढीला विरोध केला आणि कशी ती नवनिर्माण स्वरूपात राज्यव्यापी लोक चळवळ बनली ते जाणून घेण्यासारखे आहे. खरे म्हणजे, गुजरात हे जयप्रकाश नारायण यांच्यासाठीही प्रेरणादायी ठरले ज्यांनी बिहारमध्ये अशाच प्रकारची चळवळ सुरु केली. त्या काळी, "गुजरातचे अनुकरण "हा वाक्प्रचार बिहारमध्ये लोकप्रिय होता.

तसेच, गुजरात विधानसभा बरखास्त करण्याच्या गुजरातमधील बिगर-काँग्रेस शक्तींच्या मागणीने बिहारमधील बिगर-काँग्रेस शक्तींना चालना दिली. यामुळेच इंदिरा गांधी एकदा म्हणाल्या होत्या कि गुजरात विधानसभा बरखास्त करणे त्यांना महाग पडले. चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पडल्यानंतर, गुजरातमध्ये निवडणूका घेण्यात आलया (काँग्रेसला निवडणूक घेणे अजिबात मान्य नव्हते. मोरारजी देसाई यांच्या प्रयत्नांमुळे काँग्रेसला निवडणुका घेणे भाग पडले)

गुजरातमध्ये प्रथमच बाबुभाई जे.पटेल यांच्या रूपाने बिगर-काँग्रेस सरकारचा शपथविधी झाला. गुजरात सरकार जनता मोर्चा सरकार म्हणून ओळखले जायचे. त्या काळी  इंदिरा गांधी यांनीही गुजरातच्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रसंगी त्यांनी "मैं गुजरात कि बहू हूँ"(मी गुजरातची सून आहे, म्हणून लोकांनी मला पाठिंबा द्यावा) या लोकप्रिय ओळी आळवून मते मिळवली. मात्र गांधी यांना पुसटशीही कल्पना नव्हती कि त्यांच्या भ्रामक राजकारणामुळे गुजरातचे लोक विचलित होणार नाहीत.

गुजरातमधील जनता मोर्चा सरकारमुळे गुजरातमध्ये अनेकांना आणीबाणीची झळ पोचली नाही. अनेक कार्यकर्ते गुजरातमध्ये आले आणि स्थायिक झाले आणि ते राज्य एक बेट बनले जिथे लोकशाहीसाठी काम करणारे लोक आश्रय घेऊ शकत होते. केंद्रातील काँग्रेस सरकार अनेकदा गुजरातचे  जनता मोर्चा सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप करायचे  (येथे सहकार्य न करणे याचा अर्थ काँग्रेसला गुजरात सरकारकडून काँग्रेस विरोधी शक्तीचा बिमोड करण्यासाठी सहकार्य हवे आहे, ज्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडून आलेले गुजरात सरकार तयार नाही.). आणीबाणी दरम्यान देशाने सेन्सॉरशिपच्या अत्याचाराचा अनुभव घेतला.

काँग्रेसकडून सत्तेचा इतका दुरुपयोग होत होता कि इंदिरा  गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री बाबुभाई पटेल यांना त्यांच्या भाषणातील जे १५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरून प्रसारित केले जाणार होते , त्यातील काही  भाग वगळण्यास सांगितले होते. (त्या काळात संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांना १५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरून संदेश द्यायचे) जेव्हा या सर्व घडामोडी सुरु होत्या , त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक  प्रचारक होते ज्यांनी देशात लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपले सर्वस्व ओतून काम करण्याचा निर्णय घेतला होता. ते दुसरे तिसरे कुणी नसून आपले प्रिय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. संघाच्या अन्य प्रचारकांप्रमाणे , नरेंद्रभाई यांच्यावर आंदोलन, मेळावे, बैठका , साहित्याचे वाटप आदींची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या दिवसांत नरेंद्रभाई हे नाथभाई झगडा तसेच वसंत गजेंद्रगडकर यांच्याबरोबर सक्रियपणे काम करत होते. आणीबाणी लादल्यानंतरही, केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे सत्तेची लालसा असलेल्या काँग्रेसचे अत्याचार झुगारून देण्यासाठी संघटनात्मक आराखडा आणि यंत्रणा होती आणि या कामात संघाच्या सर्व प्रचारकांचा सक्रिय सहभाग होता. आणीबाणी लागू केल्यानंतर लवकरच, काँग्रेसला समजून चुकले कि काँग्रेसच्या अन्यायकारक पद्धतींचा सामना करण्यासाठी संघाकडे ताकद आणि शक्ती आहे. म्हणून भ्याडपणा दाखवत काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला.

याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते केशवराव देशमुख यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली. पूर्वयोजनेनुसार नरेंद्रभाई त्यांच्याबरोबर काम करणार होते, मात्र देशमुख यांच्या अटकेमुळे ते शक्य झाले नाही. ज्या क्षणी, नरेंद्रभाईंना समजले कि केशवरावांना अटक झाली आहे, त्यांनी ताबडतोब  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अन्य ज्येष्ठ नेते नाथालाल झगडा यांना स्कुटरवरून सुरक्षित स्थळी हलवले. नरेंद्रभाईंना हे देखील कळून चुकले कि केशवराव देशमुख यांच्याकडे काही महत्वाची कागदपत्रे आहेत, आणि पुढील कृती ठरवण्यासाठी ती सोडवणे आवश्यक आहेत. मात्र देशमुख पोलीस कोठडीत असल्यामुळे ती कागदपत्रे सोडवून घेणे केवळ अशक्य होते. मात्र  नरेंद्रभाईंनी हे आव्हान स्वीकारले आणि मणिनगरच्या एका स्वयंसेवकाच्या बहिणीच्या मदतीने ती कागदपत्रे ताब्यात घेण्याची योजना आखली. योजनेनुसार, ती महिला देशमुख यांना भेटायला पोलीस ठाण्यात गेली आणि मधल्या काळात, नरेंद्रभाईंच्या योजनेनुसार पोलीस ठाण्यातून ती कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. आणीबाणी दरम्यान, श्रीमती इंदिरा गांधी यांनी वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली.  एमआयएसए (मिसा) आणि डीआयआर अंतर्गत, अनेक पत्रकारांना अटक करण्यात आली. प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार मार्क तुली यांच्यासह अनेक परदेशी पत्रकारांना भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली. सत्य आणि अचूक माहितीचा अंधार पसरल्याचे चित्र दिसत होते. याशिवाय, अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. माहितीचा प्रसार अशक्य असल्याचे दिसत होते. मात्र, याच काळात, नरेंद्रभाई आणि अनेक संघ प्रचारकांनी हे प्रचंड कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली.

नरेंद्रभाईंनी माहितीच्या प्रसाराच्या अनोख्या मार्गाचा वापर केला आणि माहितीपत्रकाचे वाटप केले. गुजरातमधून अन्य राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर राज्य घटना, कायदा, काँग्रेस सरकारचे अत्याचार आदींची माहिती असलेली पत्रके लावण्यात आली. हे जोखमीचे काम होते कारण संशयित लोकांवर गोळीबार करण्याच्या सूचना रेल्वे पोलीस दलाला देण्यात आल्या होत्या. मात्र नरेंद्रभाई आणि अन्य प्रचारकांनी वापरलेले तंत्र यशस्वी ठरले. संघावर बंदी आणल्यामुळे आणि सेन्सॉरशिप बेसुमार वाढल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संबंधित जिल्ह्यातील स्वयंसेवकांना तालीम देण्याचा आणि जनसंघर्ष समितीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. ज्या स्वयंसेवकांनी स्वतःला आंदोलनात पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या कुटुंबियांना मदत करायला हवी असे नरेंद्रभाईंना वाटले. स्वयंसेवकांच्या कुटुंबियांना मदत करू शकतील अशी माणसे शोधण्याचे काम नरेंद्रभाईंनी हाती घेतले.

तसेच, पोलिसांना आरएसएसच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे, नरेंद्रभाईंनी भूमिगत राहण्याची चळवळ सुरु केली, याच काळात, पोलिसांच्या नकळत मणिनगर येथे गुप्त बैठकांचे आयोजन करण्यात आले आणि नरेंद्रभाईंनी ते काम चोख बजावले. काँग्रेस सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात भूमिगत चळवळीत सक्रिय सहभागी असताना नरेंद्रभाईं  प्रभुदास पटवारी यांच्या  संपर्कात आले, ज्यांनी नरेंद्रभाईंना आपल्या निवासस्थानी भेटायला बोलावले. प्रभुदास पटवारी यांच्या निवासस्थानी नरेंद्रभाईंची भेट जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी झाली, ते देखील असह्य आणिबाणी विरोधातील चळवळीत सहभागी होते.  मुस्लिम व्यक्तीचे सोंग घेतलेले जॉर्ज फर्नांडिस नरेंद्रभाईना भेटले आणि त्यांना आपली योजना सांगितली. याच दरम्यान, नानाजी देशमुख आणि जॉर्ज फर्नाडिस यांच्यातील भेटीला नरेंद्रभाई कारणीभूत ठरले. नरेंद्रभाई आणि नानाजी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या अत्याचाराविरोधात सशस्त्र लढ़ा सुरु करण्याची त्यांची योजना सांगितली, मात्र  नानाजी आणि नरेंद्रभाई यांचा याला ठाम विरोध होता. त्यांच्या मते, इंदिरा गांधी यांचे  अत्याचार कितीही हिंसक असले तरीही ही चळवळ अहिंसा मार्गाने होणे आवश्यक होते. आणीबाणीच्या काळात, सरकारने आकाशवाणीचा प्रचार यंत्र म्हणून वापर केला. केंद्र सरकारच्या धडकी भरवणाऱ्या कृत्यानंतरही त्यांची बाजू घेणारे दुसरे एक साप्ताहिक होते. आकाशवाणीवरून माहितीच्या प्रसारावर सेन्सॉरशिप लागू केल्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली. त्याचवेळी आकाशवाणीच्या बाहेर जनतेने शांततापूर्ण आंदोलन केले ज्यात जन संघर्ष समिती जनतेला माहिती पुरवण्यासाटी राज्य घटना, कायदा आणि अन्य साहित्याचे सार्वजनिक वाचन करीत असे.

अन्य बहुतांश संघ प्रचारकांप्रमाणे, नरेंद्रभाई देखील जन संघर्ष समितीला पाठिंबा देण्यात आणि लोकांना एकत्र आणण्यात सहभागी व्हायचे. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकमेव संघटना होती जिच्याकडे नियोजनबद्ध रीतीने आंदोलन करण्यासाठी आवश्यक साधने आणि रचना होती. आजही, माध्यमांच्या पक्षपाती दृष्टिकोनामुळे आणि काँग्रेसला मदत करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे आपण सर्व नाराज होतो. आणीबाणीच्या काळात देखील काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला आणि माहितीच्या व्यासपीठांचा स्वतःच्या प्रचारासाठी वापर केला. ( यामुळे एक गोष्ट आठवली, आंध्र प्रदेशात कशा प्रकारे आकाशवाणीने एनटी रामाराव यांच्याबाबतच्या  बातमीवर बहिष्कार टाकला होता जेव्हा त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत केले होते. जेव्हा आंध्र प्रदेशच्या राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले, तेव्हा देशाला "एनटी रामाराव" या व्यक्तीबाबत माहिती मिळाली )  सरकारने तुरुंगात डांबलेल्या नेत्यांना माहिती पुरवण्यात नरेंद्रभाई यांचा देखील सहभाग असायचा. वेषांतर करण्यात ते पटाईत होते आणि तरीदेखील त्यांना अटक होण्याचा धोका होता. ते वेषांतर करायचे आणि तुरुंगात जायचे आणि तुरुंगातील नेत्यांना  महत्वाची माहिती पुरवायचे. पोलीस देखील कधी नरेंद्रभाईंना ओळखू शकले नाहीत. याच काळात, 'साधना' नावाचे एक मासिक होते, त्यांनी आणीबाणी आणि सेन्सॉरशिप विरोधात लढण्याचे धैर्य दाखवले. हे मासिक लोकांपर्यंत पोचवण्यात आरएसएसची यंत्रणा खूप उपयुक्त ठरली आणि अन्य प्रचारकांप्रमाणे नरेंद्रभाई देखील यात सहभागी होते.

आणीबाणीच्या काळात, नरेंद्रभाई यांच्यासह आरएसएसचे अनेक प्रचारक इंदिरा सरकारच्या अत्याचाराविरोधातील अनेक चळवळींमध्ये सहभागी होते. या दिवसांत, संघर्ष समितीने आयोजित केलेल्या 'मुक्तिज्योती' यात्रेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला होता. ही सायकल यात्रा होती, ज्यात अनेक प्रचारकांनी भाग घेतला आणि सायकलवरून हि यात्रा करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकशाहीचा संदेश पसरवला. फार कमी लोकांना माहित असेल कि नाडियाड येथे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून सरदार वल्लभभाई पटेल यांची कन्या मणिबेन पटेल या होत्या. (हा दैवदुर्विलास आहे,  जिथे देशाला नेहरू-गांधी कुटुंबाच्या प्रत्येक पिढीची माहिती असते, स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ठावठिकाणाबाबत काही माहित नसते. आज स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्याचा जो दावा काँग्रेस करत आहे त्यांनी मणिबेन पटेल सारख्या लोकांकडे दुर्लक्ष केले.) नरेंद्रभाई यांच्यावरील पुस्तकात के.व्ही.कामत यांनी योग्य म्हटले आहे की आणीबाणी दरम्यान नरेंद्रभाई यांच्या तल्लख कौशल्याची  लोकांना जाणीव झाली. त्यांनी निःस्वार्थ प्रचारक म्हणून काम केले , मात्र संघटना आणि अन्य प्रचारकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही याकडेही त्यांनी लक्ष दिले.

कामत म्हणाले त्याप्रमाणे, नरेंद्रभाईंनी प्रचारकांसाठी केवळ अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले नाही तर अन्य देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांपर्यंत आणीबाणीच्या अत्याचाराबाबत सत्य आणि अचूक माहिती पोहोचेल याचीही काळजी घेतली. आज आपण सर्वानी नरेंद्रभाईंच्या सुशासनाच्या लाभाचा अनुभव घेतला मात्र तरीही आणीबाणीच्या काळात निःस्वार्थ कार्यकर्ता म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेणे महत्वाचे आहे. तसेच जनता मोर्चा सरकारच्या नेतृत्वाखाली गुजरातने सामान्य माणसाचे हक्क अबाधित राखण्यात मोलाची कामगिरी बजावली. आज देश दबावाखाली आहे आणि भारतात आणीबाणी सारखी निर्माण केली जात आहे आणि भारतीय जनता नवीन 'नवनिर्माण' चळवळीसाठी  गुजरात आणि नरेंद्रभाई यांच्याकडे आशेने पाहत आहे.,जी भारतीयांना कॉग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारी राजवटीपासून मुक्ती मिळवून देईल. नजीकच्या भविष्यात नवीन नवनिर्माणाची सुरुवात होईल अशी मी आशा  करतो....



Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .