नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उदय आणि १९८० च्या दशकात भारतीय जनता पार्टीत प्रवेश तसेच १९९० च्या सुमाराला भाजपामधला त्यांचा कार्यकाळ , हा सगळा काळ ,योगायोगाने स्वतंत्र भारताच्या राजकारणातला अतिशय कठीण काळ होता. त्या काळात देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात काही ना काही असंतोष धुमसत होता, देशात निर्माण होत असलेल्या या परस्पर दुराव्याकडे, केंद्र सरकार हतबलपणे बघत होते. आपल्या मातृभूमीची  एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणारा असंतोष आणि बंडखोरी पंजाब तसंच आसाममध्ये निर्माण झाली होती, देशातल्या या स्थितीकडे सरकार हतबलपणे बघत होते.राज्याराज्यांमध्येही अतंर्गत भागात विभाजनाच्या राजकारणाची मुळे खोलवर पसरत चालली होती. गुजरातमध्ये तर संचारबंदी हा  शब्द घराघरात पोहोचला होता. भाऊ भावाविरुद्ध , एक समुदाय दुसऱ्या समुदायाविरुद्ध लढताहेत अशी परीस्थिती निर्माण झाली होती. कारण वोट बँकेच्या गलिच्छ राजकारणाने समाजात दुफळी निर्माण झाली होती.

अशा वातावरणात, भारताला अखंड आणि सामर्थ्यवान बनवण्याच्या सरदार पटेल यांच्या विचारांची कास धरत, लोकशाही आणि मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांना जपण्यासाठी नरेंद्र मोदी उभे राहिले. देशात पसरलेले निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी मोदींमधला देशभक्त कामाला लागला. आणि त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपाच्या आदर्शांच्या लढाईत त्यांनी अतिशय कष्टपूर्वक स्वतःला झोकून दिले. या त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांनी अतिशय लहान वयातच स्वतःला केवळ एक समर्पित कार्यकर्ताच नाही तर एक सक्षम, प्रभावी संघटक म्हणूनही सिद्ध केले.  त्यांच्या या कर्तृत्वामुळेच, त्यावेळच्या समाजाच्या निराशाजनक परिस्थितीत, मोदी यांचा उदय होणे अगदी स्वाभाविक होते.

एकता यात्रेदरम्यान अहमदाबाद येथे श्री नरेंद्र मोदी;

एकेकाळी पृथ्वीवरचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे जम्मू- काश्मीर १९८० च्या सुमाराला एक रक्तरंजित युद्धभूमी झाले होते.  १९८७ साली केंद्र सरकारचे  संधीसाधू राजकारण आणि जम्मू कश्मीर लोकशाहीचे सातत्याने झालेले दमन ,यामुळे,निवडणुकीच्या काळात या राज्यात देशविघातक घातपाती कारवायांना ऊत आला होता.  कधीकाळी जगातील सर्वात सुन्दर स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  कश्मीरच्या रस्त्यारस्त्यावर रक्त सांडत होते, काश्मीर जळत होते. परिस्थिती इतकी चिघळली होती की काश्मीरमध्ये तिरंगा फडकावण्याची सुध्दा लोकाना भीती वाटत होती. आणि दुर्दैवाने अशा सगळ्या परिस्थितीवर उपाययोजना शोधण्याऐवजी, काही कृती करण्याऐवजी, केंद्र सरकार केवळ हतबलपणे त्याकडे बघत होते.

१९८९ साली केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईदचे काही दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. मात्र अशावेळी दहशतवाद्यांच्या बाबतीत काही कठोर भूमिका घेण्यापेक्षा केंद्र सरकारने दहशतवाद्यांची मागणी मान्य  करत त्यांच्या साथीदारांना सोडून दिले. सरकारच्या या पवित्र्यामुळे अशा देशविघातक शक्तीना नवे बळ मिळाले.  

भारताच्या सार्वभौमत्वाला असा धक्का पोहोचत असताना भारतीय जनता पार्टी केवळ मूकपणे बघत बसने शक्यच नव्हते. काश्मीरमधल्या भेटीतच भाजपाचे संस्थापक नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.त्या घटनेला दशके उलटून गेल्यावरही, काश्मीरवर भूमिका घेणे भाजपासाठी राष्ट्रीय कर्तव्य होते. या अभूतपूर्व परिस्थितीत भाजपाचे तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुरली मनोहर जोशी यांनी देशाच्या एकतेचा प्रसार करण्यासाठी , एकता यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून होणार होती, जिथे स्वामी विवेकानंदानी याना आपल्या जीवनाचा खरा अर्थ सापडला होता, तिथून ही यात्रा सुरु होऊन श्रीनगरच्या लाल चौकात तिची सांगता होणार होती.

 

या यात्रेची तयारी करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांचे उत्तम संघटन कौशल्य लक्षात घेऊन ते ही धुरा सांभाळतील असा पक्षाला विश्वास होता.

हे लक्षात घेत , आपले संघटन कौशल्य आणि अपार मेहनत याच्या जोरावर मोदींनी अतिशय अल्पावाधीत या यात्रेची मोठी तयारी केली.यात्रेच्या आयोजनात येणाऱ्या संकटांचा त्यांनी मोठ्या धाडसाने सामना केला. कुठलीही भीती नं बाळगता, धोका पत्करून मोदींनी यात्रेच्या सगळ्या ठिकाणांची जातीने पहाणी केली, कार्यकत्यांशी चर्चा केली.

त्यांनी पक्ष कार्यकर्त्याना उत्साह दिला, प्रोत्साहन दिले , त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. अशा तऱ्हेने त्यांनी या यात्रेच्या यशस्वीतेसाठी सकारात्मक पार्श्वभूमी तयार केली. या सगळ्या प्रक्रियेत आपण केवळ उत्तम संघटक असल्याचेच सिद्ध केले नाही तर कुठल्याही परिस्थितीत वेगाने काम करून इच्छित साध्य पूर्ण करण्याचे दुर्मिळ कसब आपल्याकडे आहे, हे ही दाखवून दिले. या घटनेनंतर विपरीत परिस्थितीतही त्वरीत निर्णय घेण्याची आणि तो निर्णय अमलात आणण्याची आपली क्षमता मोदींनी सिद्ध केली.  

एकता यात्रेदरम्यान श्री नरेंद्र मोदी;

एकता यात्रेचा शुभारंभ ११ डिसेंबर १९९१ या दिवशी झाला, सुब्र्ह्मण्याम भारती यांच्या जयंतीचे आणि गुरु तेगबहादूर यांच्या बलिदान दिवसाचे औचित्य साधून या दिवशी या यात्रेची सुरुवात करण्यात आली. या यात्रेदरम्यान विभाजनाचे आणि हिंसेचे राजकारण याला विरोध आणि काश्मीरमधल्या दहशतवादाला विरोध, हे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित करण्यात आले होते.

जिथे जिथे मोदी जात तिथे श्यामाप्रसाद मुखर्जीचा संदेश कार्यकर्त्यांना सांगत असत. ते सांगत, की भारताची एकता ही इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाची आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांविषयी वेगवेगळे मापदंड असावेत, हे श्यामाप्रसाद मुखर्जीना मान्य नव्हते, तोच वारसा मोदी पुढे चालवत. राष्ट्रविघातक शक्तीना चोख उत्तर देण्याची तीच योग्य वेळ होती. आणि अशावेळी मोदी सर्वात पुढे होते ! एकता यात्रा जिथे जिथे गेली तिथे तिथे तिला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. या यात्रेदरम्यान मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्राच्या पुनर्निर्माणाची गरज व्यक्त केली, त्याला देशभरातून प्रतिसाद मिळाला.

देशाची परिस्थिती बघूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या कॉंग्रेस सरकारच्या डोळ्यात धडधडीत अंजन घालणारी ही एकता यात्रा ठरली. आणि या यात्रेचे यश हे नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीतसाठी अतिशय  महत्वाचे  ठरले , हे वेगळे सांगायला नको. कारण त्यांचे संगठन कौशल्याचे कसब या यात्रेतून जगाला कळले. त्यावेळी मोदी यांनी स्वतःच जनतेला धर्मनिरपेक्षतेच्या बेगडी आणि वोटबँकेच्या संधीसाधू राजकारणाला तिलांजली देण्याचे आवाहन केले होते. ज्यावेळी २६ जानेवारी १९९२ साली श्रीनगर येथे तिरंगा फडकला, तेव्हा तो प्रसंग पाहून नरेंद्र मोदी भावूक झाले होते. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी हे राष्ट्रीय मिशन यशस्वीपणे पूर्ण केले. हे निशाण यशस्वी होणे म्हणजे नरेंद्र मोदी यांचे धाडस, दृष्टीकोन, कौशल्य यांचा विजय होता, ज्यामुळे देशविघातक शक्तींशी ते मुकाबला करू शकले.

  • AmpiliJayaprakash February 13, 2025

    🙏👍
  • Govind Ram January 28, 2025

    जय हिंद
  • krishangopal sharma Bjp January 06, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  • krishangopal sharma Bjp January 06, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  • krishangopal sharma Bjp January 06, 2025

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  • Rahul Naik December 07, 2024

    🙏🙏
  • Chhedilal Mishra December 01, 2024

    Jai shrikrishna
  • कृष्ण सिंह राजपुरोहित भाजपा विधान सभा गुड़ामा लानी November 21, 2024

    जय श्री राम 🚩 वन्दे मातरम् जय भाजपा विजय भाजपा
  • Devendra Kunwar October 08, 2024

    BJP
  • manvendra singh September 27, 2024

    जय हिन्द जय भारत वंदेमातरम
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 28 lakh companies registered in India: Govt data

Media Coverage

Over 28 lakh companies registered in India: Govt data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .