पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी प्रथम तेलंगणातील करीमनगर येथील शेतीसोबतच पशुसंवर्धन करणाऱ्या आणि फलोत्पादनही घेणाऱ्या एम मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याशी संवाद साधला. रेड्डी हे बीटेक पदवीधर असून एका सॉफ्टवेअर कंपनीचे माजी कर्मचारी आहेत. शिक्षणामुळे त्यांना एक उत्तम शेतकरी बनण्यास मदत झाली आहे, असे आपल्या प्रवासाचे वर्णन करताना रेड्डी यांनी सांगितले. मल्लिकार्जुन रेड्डी हे एकात्मिक प्रणालीचा अवलंब करत पशुपालन, फलोत्पादन आणि नैसर्गिक शेती करत आहे.या संमिश्र दृष्टिकोनाचा मुख्य फायदा म्हणजे त्यांना नियमित दैनंदिन उत्पन्न मिळू लागले. ते वनौषधींची शेतीही करतात त्यामुळे पाच प्रवाहातून ते उत्पन्न मिळवत आहेत. एकाच प्रकारच्या पारंपरिक शेती पध्दतीने 6 लाख कमवत असताना आता एकात्मिक पध्दतीने ते वर्षाला 12 लाख रुपये कमवत आहेत हे त्यांच्या पूर्वीच्या उत्पन्नाच्या दुप्पट आहे.
रेड्डी यांना आयसीएआरसह अनेक संस्थांनी आणि माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्तेही पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ते एकात्मिक आणि नैसर्गिक शेतीचा प्रचार करत असून जवळपासच्या भागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देत आहेत.त्यांनी किसान क्रेडिट कार्ड, मृदा आरोग्य कार्ड, ठिबक सिंचन अनुदान आणि पीक विमा या योजनांचा लाभ घेतला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार व्याज अनुदान देते त्या किसान क्रेडीट कार्डवर घेतलेल्या कर्जावरील व्याजदर तपासावा असे पंतप्रधानांनी रेड्डी यांना सांगितले.
पंतप्रधानांनी त्यांना विद्यार्थ्यांना भेटून सुशिक्षित तरुणांना कृषी क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी रेड्डी यांच्या दोन्ही मुलींशीही संवाद साधला.सुशिक्षित तरुण शेतीकडे वळल्याबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही संधींचे एक सशक्त उदाहरण आहात.तुमचे कार्य इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देईल, असे पंतप्रधानांनी एम मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या शेतीच्या एकात्मिक दृष्टिकोनाचे कौतुक करताना सांगितले.