पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य माध्यमाद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले.
या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेमधील हजारो लाभार्थी सामील झाले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते .
पंतप्रधानांनी तिरुवल्लूर येथील शेतकरी हरिकृष्ण यांचे ‘वणक्कम’ म्हणून स्वागत केले. थिरू हरिकृष्णन यांना फलोत्पादन आणि कृषी विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
चांगले शिक्षण घेतल्यानंतर शेती व्यवसायाकडे वळणाऱ्या सुशिक्षित शेतकऱ्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. शेतकरी कल्याणाशी संबंधित बहुतांश सरकारी योजना आणि आयुष्मान भारत योजनेचे हरिकृष्ण लाभार्थी आहेत. नॅनो युरिया सारखी नाविन्यपूर्ण योजना आणल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. तसेच हरिकृष्ण आपल्या कृषिकार्यात ड्रोन आणि इतर आधुनिक साधनांचा वापर करतात.
शेती करताना, आधुनिक पद्धतींचा अवलंब करत असल्याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले, “सरकार नेहमीच तुमच्या पाठीशी उभे आहे”.