पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन व ई-लिलाव आज 24 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आले. लिलावाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि हजारो निविदा प्राप्त झाल्या. ई-लिलावापासून मिळालेली सर्व रक्कम ‘नमामि गंगे मिशन’ला दान केली जाईल.
केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने पंतप्रधानांना भेट म्हणून देण्यात आलेल्या एकूण 2772 स्मृतिचिन्हांची विक्री करण्यासाठी 14 सप्टेंबरपासून ई-लिलावाचे आयोजन केले होते. सर्व वस्तू नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. स्मृतिचिन्हांमध्ये पेंटिंग्ज, शिल्पकला, शाल, जॅकेट्स आणि पारंपारिक संगीत वाद्ये यांच्यासह विविध आणि संस्मरणीय वस्तूंचा समावेश आहे.
सुरुवातीला ई-लिलाव 3 ऑक्टोबरपर्यंत होणार होता. तथापि, प्रचंड लोकांचा प्रतिसाद आणि अधिकाधिक लोक सहभागी व्हावे या विनंतीच्या पार्श्वभूमीवर लिलाव प्रक्रिया आणखी तीन आठवड्यांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपर्यंत, लिलावाच्या सर्व वस्तू विकल्या गेल्या आहेत. बॉलीवूडचे अनिल कपूर, अर्जुन कपूर आणि गायक कैलाश खेर यांच्यासारख्या अनेकांनी लिलावात रस दाखविला आहे.
गणपतीची छोटी मूर्ती आणि कमळाच्या आकाराची सजावट असलेल्या लाकडी पेटीची या प्रदर्शनात सर्वात कमी किंमत म्हणजे 500 रुपये ठेवण्यात आली. महात्मा गांधी यांच्यासमवेत पंतप्रधानांच्या तैलचित्राचे मूल्य रुपये २. ५ लाख सर्वाधिक ठेवण्यात आले होते. त्याची अंतिम बोली २५ लाख झाली.
पंतप्रधान त्यांच्या आईकडून आशीर्वाद घेत असल्याच्या तैलचित्राची मूळ किंमत एक हजार रुपये होती, ते बोली द्वारे 20 लाख रुपयांना विकल्या गेले. लिलावाच्या इतर लोकप्रिय वस्तूंमध्ये मणिपुरी फोक आर्ट्सचे प्रदर्शन (दहा लाख रुपयांच्या बोलीवर विकले जाणारे मूळ आधार मूल्य, ५०,००० रुपये ), गाय वासराला दूध देतानांच्या धातूच्या मूर्तीची किंमत चार हजार होती ती १० लाख रुपयांना विकली गेली.
तसेच स्वामी विवेकानंदची धातूची १४ cm सें.मी.लांबीची मूर्ती (मूळ किंमत चार हजार होती ती रुपये सहा लेखाला विकल्या गेली.