पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत स्वयंरोजगार असलेल्या आणि बचत गटाशी संलग्न असलेल्या राजस्थानच्या डुंगरपूर येथील ममता धिंडोरे यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.ममता धिंडोरे यांना गुजराती भाषाही चांगली अवगत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्या 5 जणांच्या एकत्रित कुटुंबातून येतात आणि 150 गटात 7500 महिलांसोबत काम करतात. त्या जागरूकता निर्माण करतात , प्रशिक्षण देतात आणि गटातील सदस्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करतात.
त्यांनी स्वत:कर्ज घेतले आणि त्यांनी भाजीपाल्याची शेती सुरु केली आणि त्यांनी भाजीचे दुकान देखील सुरु केले.त्या नोकरी देणाऱ्या आहेत .ममता यांनी पंतप्रधान आवास योजनेद्वारे पक्क्या घराचे त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याची माहिती यावेळी दिली. सरकारी मदत मिळवण्यासाठी निधी मिळवण्याच्या आणि भ्रष्टाचारमुक्त प्रक्रियेसंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना अवगत केले.'मोदींच्या गॅरंटीची गाडी' या बद्दल लोकांना जागरुक करण्यात त्या आघाडीवर आहेत आणि याद्वारे अर्ज करून योजनांचा लाभ मिळण्याची हमी आहे, असे त्या लोकांना सांगतात.
आधुनिक जगाविषयीच्या त्यांच्या सजगतेविषयी पंतप्रधानांनी कौतुक केले.आणि त्यांच्या गटातील महिलांसोबत केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिले आणि यावेळी उपस्थित महिला उद्योजकांशी संवाद साधला. “डुंगरपूरच्या एका छोट्या गावात माझ्या माता-भगिनी अत्यंत आनंदी आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत हे पाहून मी भारावून गेलो आहे”. असे पंतप्रधान म्हणाले.इतर महिलांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या उत्साहाचेही मोदी यांनी कौतुक केले. गेल्या 9 वर्षांपासून सरकार बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याच्या योजनेचा पुनरुच्चार केला आणि या प्रकल्पात त्यांच्यासारख्या बचत गटांच्या भूमिकेवर भर दिला.