जॉर्डनच्या रॉयल हॅशेमाईट कोर्टाचे प्रमुख डॉ फ़ाईझ तारावनेह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 10 मार्च 2017 रोजी चर्चा केली.
द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी आणि या संदर्भातल्या संधीविषयी यावेळी चर्चा झाली. पश्चिम आशियातल्या परिस्थितीविषयी आणि दहशतवादाविषयी डॉ फ़ाईझ तारावनेह यांनी आपली मते व्यक्त केली आणि दहशतवादा संदर्भात सर्वंकष आंतरराष्ट्रीय प्रतिसाद आवश्यक असल्याचे सांगितले.
राजे अब्दुल्ला द्वितीय अल हुसेन यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्याचेही डॉ. फ़ाईझ तारावनेह यांनी सांगितले.