फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांच्या आगामी फ्रान्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीची माहिती बोन यांनी पंतप्रधानांना दिली.
14 जुलै रोजी आयोजित ‘बॅस्टिल डे’ समारंभात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.
हिरोशिमा येथे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीची आठवण करून देत , हा संवाद कायम ठेवत भारत-फ्रान्स धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने मॅक्रॉन यांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.