फ्रान्सचे अध्यक्ष, इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोन, यांनी आज म्हणजेच 5 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेत, पंतप्रधानांनी, संरक्षण, सुरक्षा आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासह दोन्ही देशातील धोरणात्मक भागीदारीचे मुद्दे अधोरेखित केले आणि विविध क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यातील घनिष्ठ सहकार्यावर प्रकाश टाकला. भारताच्या G20 अध्यक्षपदाला फ्रान्सने दिलेल्या पाठिंब्याचे पंतप्रधानांनी स्वागत केले.
बोन यांनी, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचा मैत्रीचा संदेश पंतप्रधानांपर्यंत पोहचवला. तसेच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी आज झालेल्या भेटीचे संक्षिप्त वृत्त पंतप्रधानांना दिले.
त्याशिवाय दोन्ही देशातील, इतर परस्पर सहकार्याची क्षेत्रे, ज्यात ऊर्जा आणि सांस्कृतिक क्षेत्रांचा समावेश होता, त्यावरही यावेळी चर्चा झाली.
बाली इथे अलीकडेच, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी झालेल्या भेटीचे पंतप्रधानांनी स्मरण केले. तसेच, मॅक्रॉ यांना भारत भेटीचे आमंत्रणही दिले. मॅक्रॉ देखील भारतात येण्यास उत्सुक असल्याचे बोन यांनी यावेळी सांगितले.
Had a fruitful meeting with Mr. Emmanuel Bonne, Diplomatic Advisor to President Macron covering a wide range of issues from Defence & security to culture. Glad that our Strategic Partnership is further deepening. Conveyed invitation to my friend @EmmanuelMacron to visit India. pic.twitter.com/nJu5uKAueS
— Narendra Modi (@narendramodi) January 5, 2023