रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री रोगोझीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी यावर्षी तिसऱ्यांदा भारत भेटीवर आलेले रोगोझीन यांचे स्वागत केले. यावर्षात उच्चस्तरीय देवाण-घेवाणीत झालेल्या वाढीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आणि जून मध्ये वार्षिक द्विपक्षीय परिषदेसाठी सेंट पीटर्सबर्गला दिलेल्या भेटीला उजाळा दिला.
पंतप्रधान मोदी आणि रोगोझीन यांनी द्विपक्षीय संबंधाचा सातत्यपूर्ण विस्तार आणि त्यातील विविधतेबाबत चर्चा केली. यावेळी विशेषत: ऊर्जा क्षेत्र आणि उच्च तंत्रज्ञान सहकार्याबाबत चर्चा झाली.
दिमित्री रोगोझीन यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि पंतप्रधानांनी त्याचा स्वीकार केला.