केंद्रीय अन्य प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या सदस्यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता.
गुरूद्वारासह सेवाभावी धार्मिक संस्थांकडून लंगर आणि प्रसादासाठी मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या सीजीएसटी आणि आयजीएसटी चे परतावे देऊ करणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवा भोजन योजनेबद्दल या शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दलही शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानले.