भाजपामधील इतर मागासवर्गीय नेते आणि खासदारांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. इतर मागासवर्ग आयोगाला वैधानिक दर्जा दिल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचा सत्कार केला. या ऐतिहासिक पावलामुळे इतर मागासवर्ग समुदाय सक्षम होण्यास साहाय्य मिळेल, असे सदस्यांनी सांगितले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.99553400_1533648575_dele1.jpg)
पाठिंब्याबद्दल आणि कौतुकाबद्दल पंतप्रधानांनी शिष्टमंडळाचे आभार मानले. ओबीसी समुदायाच्या उन्नतीसाठी काम सुरु ठेवण्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. आपल्या हक्कांबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी सदस्यांना केले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.24047900_1533649172_dele2.jpg)
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार यावेळी उपस्थित होते.