नागालँड जीबी (गाव बुऱ्हास) महासंघाच्या 15 सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नागालँड जीबी महासंघ हा सर्व नागा खेडयातल्या “गाव बुऱ्हास” अर्थात “गाव प्रमुखांचा” महासंघ आहे.
पंतप्रधानांची भेट झाल्याने आंनद होत असून, पंतप्रधानांच्या नागा शांतता प्रक्रियेला आपला पूर्णत: पाठिंबा असल्याचे या सदस्यांनी सांगितले. पंतप्रधान ही प्रकिया पूर्णत्वाला नेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि सर्वच नागरी संस्था जमातींनी शांततेसाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केल्याचेही सांगितले.
शिष्टमंडळाचे स्वागत करतांना आनंद होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच हे शिष्टमंडळ शांततेचा संदेश घेऊन असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या शिष्टमंडळांच्या पाठिंब्याबद्दलही पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले.