मुस्लिम उलेमा, बुध्दिजीवी, शिक्षणतज्ञ आणि इतर मान्यवर मंडळींचा समावेश असणाऱ्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. समाजातील अल्पसंख्याकासह सर्व घटकांचे सक्षमीकरण होत आहे. आर्थिक-सामाजिक आणि शैक्षणिक सबलीकरणामध्ये सरकारने सर्व समावेशकतेचा पुरस्कार केला आहे. त्याबद्दल या शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या यात्रेकरुंच्या संख्येत वाढ करण्यासाठी सौदी सरकारने सर्व समावेशकतेचा पुरस्कार केला त्याबद्दल या शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या यात्रेकरुंच्या संख्येत वाढ करण्यासाठी सौदी सरकारने मान्यता दिली असून यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल या शिष्टमंडळाने आभार मानले.
पंतप्रधानांनी, भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधात सुरु केलेल्या मोहिमेला या शिष्टमंडळाने एक मुखाने समर्थन दिले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारने आघाडी उघडल्यामुळे त्याचा लाभ गरीबांसह अल्पसंख्यांक समाजालाही होणार असल्याचे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.
पंतप्रधानांनी सीमेपार सर्व देशांशी भारताचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले असून जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानासाठी केलेल्या प्रयत्नांचेही या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी विशेष कौतुक केले.
भारतातील युवक आता जहालमतवादाला यशस्वीपणे विरोध करत आहेत, त्याचा परिणाम आज जगाच्या विविध भागावर पडलेला दिसून येत आहे. याचे श्रेय आपल्या लोकांच्या समृध्द वारशाला दयावे लागेल आणि हा वारसा आपण पुढे न्यायचा आहे ही सर्वांची संयुक्तिक जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
भारताची सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक पोत समृध्द आहे, त्यामुळे दहशतवाद आणि दहशतवादी पुरस्कृत कारवाया करणाऱ्यांचा दृष्ट मनसूबा कधीच साध्य होणार नाही. भारतात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा या दृष्ट शक्तींचा हेतू यशस्वी होऊ शकणार नाही. गरीबीतून कायमची मुक्तता होण्यासाठी शिक्षणाचे महत्व आणि रोजगारासाठी कौशल्य विकास यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
भारतीय मुस्लिमांविषयी बाहेरच्या देशात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करुन हज यात्रेकरुंच्या संख्येत वाढ करण्याची परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी सौदी अरेबिया सरकारचे कौतुक केले.
या शिष्टमंडळामध्ये इमाम उमेर अहमद इलियासी, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जयीरुद्दिन शाह, तलत अहमद (जमिया मिलिया इस्लिामिया विद्यापीठाचे कुलगुरु) आणि ऊर्दू पत्रकार शहिद सिद्दक्की यांचा समावेश होता. याप्रसंगी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर उपस्थित होते.