“यंग फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन” च्या 25 सदस्यीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
महिला सक्षमीकरण, महिला उद्योजकता आदी विषयांवर या शिष्टमंडळाने पंतप्रधानांशी संवाद साधला. शिष्टमंडळातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे पंतप्रधानांनी सविस्तर निरसन केले.
“स्वच्छ भारत अभियानामुळे टाकाऊ पासून संपत्ती” या उद्योगासाठी मोठी संधी उपलब्ध होत असून सोबतच सामाजिक आरोग्यालाही मोठा फायदा होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
जलसंवर्धनाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देतांना पंतप्रधानांनी सांगितले की, आपण पाण्याच्या सुयोग्य वापरावर तसेच सूक्ष्म आणि ठिबक सिंचनावर व्यक्तीगत लक्ष केंद्रीत करायला हवे, असे स्पष्ट केले.
कौटुंबिक मूल्ये, विविधतेचा स्वीकार आणि पर्यावरणाविषयी जागरुकता या भारताच्या तीन महान परंपरा असून आपण त्यांचे संवर्धन करायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी शिक्षण, कौशल्य विकास, कला आणि संस्कृती तसेच महिलांची सुरक्षा आदी विषयांवरही चर्चा झाली.