भूतान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन पुढीलप्रमाणे
‘मी 17 आणि 18 ऑगस्ट 2019 रोजी भूतानच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे. दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला हा माझा भूतान दौरा आपल्या विश्वासू मित्र आणि शेजारील देश भूतानबरोबरच्या भारताच्या संबंधाने सरकार देत असलेल्या सर्वोच्च महत्वाचे प्रतिबिंब आहे.
भारत आणि भूतानदरम्यान उत्तम द्विपक्षीय संबंध असून विकास भागीदारी, परस्पर हिताचे जलविद्युत सहकार्य आणि मजबूत व्यापार आणि आर्थिक संबंध अधोरेखित करतात. सामायिक, धार्मिक वारसा आणि उभय देशांमधील जनतेतील संबंधांमुळे ते अधिक दृढ झाले आहेत.
दोन्ही देशांनी गेल्यावर्षी अधिकृत राजनैतिक संबंधांचा सुवर्ण महोत्सव संयुक्तपणे साजरा केला.
आजची भारत-भूतान भागीदारी विशेष असून सरकार भारत सरकारच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणाचा महत्वाचा स्तंभ आहे.
भूतानचे राजे महामहीम चवथे ड्रक ग्यालपो आणि भूतानच्या पंतप्रधानांबरोबर आपल्या द्विपक्षीय संबंधांबाबत फलदायी चर्चा करण्यासाठी मी उत्सूक आहे. भूतानच्या प्रतिष्ठीत रॉयल विद्यापीठात युवा भूतानी विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठीदेखील मी उत्सूक आहे.
माझ्या या दौऱ्यामुळे भूतानबरोबरच्या आपल्या मैत्रीला चालना मिळेल आणि दौन्ही देशांच्या जनतेच्या उज्ज्वल भवितव्य आणि प्रगतीला प्रोत्साहन मिळेल, असा मला विश्वास वाटतो.’