लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशभरात शौचालयांची उभारणी असो, कचऱ्याची विल्हेवाट लावणे असो, ऐतिहासिक वारशाचे जतन असो किंवा स्वच्छताविषयक स्पर्धा असो, या सर्वांच्या माध्यमातून देश आज स्वच्छतेच्या क्षेत्रात नवे अध्याय लिहित आहे असे ते म्हणाले.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“लोकसहभागामुळे एखाद्या देशाच्या विकासाला कशा प्रकारे नवी उर्जा मिळते याचे स्वच्छ भारत अभियान हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. शौचालयांची उभारणी असो किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणे असो, ऐतिहासिक वारशाचे जतन असो किंवा स्वच्छताविषयक स्पर्धा असो, आज देश स्वच्छतेच्या बाबतीत नवनव्या कथा लिहित आहे.
जनभागीदारी किस प्रकार किसी देश के विकास में नई ऊर्जा भर सकती है, स्वच्छ भारत अभियान इसका प्रत्यक्ष प्रमाण है। शौचालय का निर्माण हो या कचरे का निष्पादन, ऐतिहासिक धरोहरों का संरक्षण हो या फिर सफाई की प्रतिस्पर्धा, देश आज स्वच्छता के क्षेत्र में नित नई गाथाएं लिख रहा है। pic.twitter.com/1FzV3yyfHg
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2022