77व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सहकारी संस्था देशाच्या सामाजिक अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी, त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या घटकाला देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बळकट करण्यासाठी वेगळ्या सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. सर्वाधिक गरीबांनी मागितलेली दाद ऐकली जाईल, त्यांच्या गरजांची पूर्तता होईल आणि देशाच्या विकासात ते योगदान देऊ शकतील हे सुनिश्चित करत सहकार मंत्रालय देशात सहकारी संस्थांच्या जाळ्याचा विस्तार केला जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताने सहकारातून समृद्धीचा मार्ग निवडला आहे, यावर त्यांनी भर दिला.