केवडिया या स्थानाला सर्व दिशांनी रेल्वे कनेक्टिविटी देणारा हा क्षण सर्वांसाठीच अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातमधील केवडियाला देशातील विविध भागांशी जोडणाऱ्याआठ रेल्वे गाड्यांना रवाना करण्यासाठी हिरवा कंदील दाखवून राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्धाटन करताना ते बोलत होते.
केवडिया आणि चेन्नई, रेवा, दादर ,दिल्ली जोडले जात आहेत या बरोबरच केवडिया व प्रतापनगरमधील मेमू सेवा तसेच दाभोई -चांदोड भागातील रेल्वे सेवेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण , चांदोड-केवडिया दरम्यान नवा रेल्वे मार्ग हे केवडियाच्या विकासाचे नवे अध्याय आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. यामुळे पर्यटक व स्थानिक आदिवासी दोघानाही लाभ होईल तसेच स्वयंरोजगार व रोजगार याचे नवे मार्ग निर्माण होतील असे त्यांनी नमूद केले.
हा रेल्वे मार्ग नर्मदेच्या तीरावरील कर्नाली, पोईचा व गरुडेश्वर अश्या अनेक श्रद्धास्थानांना जोडणारा असेल.