आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रशंसा केली आहे. पद्म पुरस्कार विजेते, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञान-व्यावसायिक नेते, प्रख्यात महिला व्यावसायिक, अभिनेते आणि खेळाडूंनी पंतप्रधानांच्या भाषणातील दूरदृष्टीचे कौतुक केले आहे. 

भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महासंघाचे सरचिटणीस अनिल भारद्वाज यांच्या मते या भाषणात  भारतातील एमएसएमई समुदायातील लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता या ( Demography, Democracy and Diversity ) 3D मुद्द्यांवर पंतप्रधानांचे विचार प्रतिध्वनित झाले.

 

नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम चे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनीही हे तीन 'डी’ भारताच्या विकासाच्या वाटचालीत कशी मदत करत आहेत याबद्दल मत व्यक्त केले.

 

जगज्जेता, अर्जुन पुरस्कार विजेता, भारतीय तिरंदाज अभिषेक वर्मा यांनी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील जनतेला  शुभेच्छा दिल्या आणि पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी सिद्धांताला समर्थन देण्याचे आवाहन केले.

 

आंतरराष्ट्रीय पदक विजेता गौरव राणा यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्र प्रथम, नेहमीच  प्रथम या संदेशाविषयी आपले मत मांडले.

 

आंतरराष्ट्रीय क्रीडा पदक विजेते निहाल सिंग यांनीही राष्ट्र प्रथमची कल्पना विशद केली

 

आंतरराष्ट्रीय पदक विजेती फेंसर जस्मिन कौर यांनीही राष्ट्र प्रथम बद्दल आपले मत मांडले.

 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते किरण यांचे हे ट्विट.

 

आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या नॅन्सी मल्होत्रा यांनीही देश प्रथम यावर भर दिला.

 

आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी दिलेला संदेश सर्वांनी आत्मसात करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या  प्रिया सिंग यांनी  केले.

 

पद्मश्री भारत भूषण त्यागी यांनी  शेतकरी आणि राष्ट्र उभारणीतील  त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी घेतलेली दखल याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

त्याचप्रमाणे वेदव्रत आर्य यांनी शेतकऱ्यांच्या  प्रगतीसाठी लाभदायक अशा अलीकडील उपक्रमांचा उल्लेख केला.

 

सुप्रसिद्ध अभिनेत्री सरिता जोशी यांनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राष्ट्र उभारणीतील महिलांची भूमिका अधोरेखित केल्यामुळे महिलांना नवे बळ मिळाल्याचे सांगितले.

 

इंडिया रिसर्च  CLSA चे प्रमुख इंद्रनील सेन गुप्ता  यांनी  भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल अशी आशा व्यक्त केली.

 

पंतप्रधानांनी आज सुधारणा, कामगिरी  आणि परिवर्तनाचा स्पष्ट नारा दिला  आहे.

 

पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून तरुणांना सुधारणा, कामगिरी  आणि परिवर्तनाची चांगली दिशा कशी  दिली याबद्दल  प्रख्यात कथ्थक नृत्यांगना नलिनी अस्थाना यांनी आपले मत मांडले. 

 

पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. अलका कृपलानी यांनी महिला सक्षमीकरणाला महत्त्व दिल्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानले.

 

कलारी कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला यांनी महिलांच्या उत्थानाबद्दल आणि महिलांवरील गुन्हेगारीविरोधात भाष्य केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले.

 

पद्मभूषण पुरस्कार विजेत्या आणि प्रख्यात गायिका के एस  चित्रा  या महिला सक्षमीकरणाबाबत पंतप्रधानांना वाटणारी काळजी आणि महिलांसाठीच्या नवीन उपक्रमांबाबत  नवीन घोषणांमुळे भारावून गेल्या.

 

पायलट कॅप्टन झोया अग्रवाल,(सॅन फ्रान्सिस्को ते बेंगळुरू पर्यंतच्या सर्वात प्रदीर्घ  उड्डाणांपैकी एक उड्डाणाच्या  सर्व महिला कर्मचारी चमूच्या  कॅप्टन) यांनी पंतप्रधानांनी जगात सर्वाधिक व्यावसायिक महिला  वैमानिक असल्याचा उल्लेख केल्याबद्दल आनंद व्यक्त केला, ज्यामुळे महिलांना  केवळ विमान वाहतूक क्षेत्रातच नव्हे तर इतर क्षेत्रांमध्येही महिला प्रणित विकासाला चालना मिळाली.

 

आयआयटीई गांधी नगरचे कुलगुरू हर्षद पटेल यांनी  सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाच्या पंतप्रधानांच्या संदेशाने गेल्या नऊ वर्षांत आपल्याला कशी मदत केली आहे आणि पुढील 25 वर्षांत भारत एक विश्व मित्र कसा होऊ शकतो हे स्पष्ट केले.

 

Lt. Gen. (Retd) Madhuri Kanitkar, Vice Chancellor, Maharashtra University of Health Sciences talked about PM’s emphasis on stressed the role of women in the development of our country.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's Economic Growth Activity at 8-Month High in October, Festive Season Key Indicator

Media Coverage

India's Economic Growth Activity at 8-Month High in October, Festive Season Key Indicator
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi pays homage to Dr Harekrushna Mahatab on his 125th birth anniversary
November 22, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today hailed Dr. Harekrushna Mahatab Ji as a towering personality who devoted his life to making India free and ensuring a life of dignity and equality for every Indian. Paying homage on his 125th birth anniversary, Shri Modi reiterated the Government’s commitment to fulfilling Dr. Mahtab’s ideals.

Responding to a post on X by the President of India, he wrote:

“Dr. Harekrushna Mahatab Ji was a towering personality who devoted his life to making India free and ensuring a life of dignity and equality for every Indian. His contribution towards Odisha's development is particularly noteworthy. He was also a prolific thinker and intellectual. I pay homage to him on his 125th birth anniversary and reiterate our commitment to fulfilling his ideals.”