चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचे कौतुक केले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेले ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये एक नवीन अध्याय लिहिला आहे . प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत उंच भरारी घेतली आहे.
ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची साक्ष आहे. त्यांच्या धाडसाला आणि कुशाग्र बुद्धिमत्तेला मी सलाम करतो!”
Chandrayaan-3 scripts a new chapter in India's space odyssey. It soars high, elevating the dreams and ambitions of every Indian. This momentous achievement is a testament to our scientists' relentless dedication. I salute their spirit and ingenuity! https://t.co/gko6fnOUaK
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2023