बरं, भारतातील डिजिटल क्रांती इतकी उद्बोधक ठरण्याचे खरे कारण म्हणजे सरकारने खरोखरच समाजातील सर्व वर्गांना लाभ देण्यासाठी तिचा वापर केला आहे. यामुळे केवळ मूठभर नशीबवान लोकांनाच त्याचे फायदे मिळालेले नाहीत आणि मला वाटते की ही जगातील इतर देशांपेक्षा खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटते की भारताचे हे यश अद्वितीय असून इतर देशही त्यापासून धडे घेऊ शकतात. - प्रोफेसर पॉल मायकेल रोमर, अमेरिकन अर्थतज्ज्ञ
मला वाटते की पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल साउथमधील इतर देशांनी स्वत:ला सांगायला हवे की, जर भारत हे करू शकतो, तर आपणही करू शकतो. भारताने आधार क्रमांक तयार करून ज्याप्रमाणे पूर्वी कधीही करून पाहिले न गेलेले काहीतरी प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा दाखवली तशीच ती या देशांनीही दाखविणे आवश्यक आहे. म्हणूनच इतर देश भारताच्या अनुभवाचे अनुसरण करू शकतात आणि त्यापासून बोध घेऊ शकतात, परंतु त्यांनी आपण श्रीमंत देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही हे देखील स्वतःला समजवावे लागेल. आपण श्रीमंत देशांकडे सगळी सूत्रे सोपवू शकत नाही कारण आपल्याला आपल्या नागरिकांच्या जीवनाच्या दर्जात जशी सुधारणा अभिप्रेत आहे, तशी ते घडवू शकत नाहीत.
" युनायटेड स्टेट्सची भारतासोबतची भागीदारी यापूर्वीच्या काळात कधी नव्हती इतकी मजबूत, जवळची आणि अधिक गतिमान झाली आहे. दरवेळी जेव्हा पंतप्रधान मोदींसोबत बैठक होते तेव्हा दरवेळी सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधून काढण्याची त्यांची क्षमता पाहून मी थक्क होतो. आजची भेटही काही निराळी नव्हती."
“ ऑलिम्पिकसाठी रवाना होण्याआधी, आम्ही पंतप्रधानांना जेव्हा त्यांच्या घरी भेटलो, तेव्हा मी मागच्या रांगेत बसलो होतो. पण तरीही त्यांनी माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं होतं, हे मला माहितही नव्हतं. पॅरिसमध्ये मला पदक मिळाल्यानंतर आमचं जेव्हा फोनवरून बोलणं झालं तेव्हा मी शेवटच्या रांगेत बसलो होतो हे त्यांना आठवत होतं. असं आहे त्यांचं निरीक्षण कौशल्य."
"पंतप्रधान मोदींसोबतच्या संभाषणामुळे मला लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकमध्ये आणखी मोठ्या पदकाचं ध्येय ठेवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे."
“जेव्हा मी पदक जिंकलं, तेव्हा पंतप्रधान मोदींनी मला फोन केला आणि सुरुवातीचे त्यांचे शब्द माझ्या मातृभाषेतले मराठीतले होते. अशा गोष्टींमुळे खेळाडूचा आत्मविश्वास खूप वाढतो. असं वाटतं की जणू काही आपला संपूर्ण देशच आम्हाला पाठिंबा देतो आहे."
"त्यांचे शब्द ऐकून अक्षरशः माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि मी देशासाठी पदक जिंकलं आहे या भावनेनं मन उचंबळून आलं!"
" खेळाडूंना त्यांच्या विशिष्ट कोशातून बाहेर काढण्याची पंतप्रधानांनी एक अनोखी पद्धत आहे. पंतप्रधानांनी असे प्रश्न विचारले: 'तुमच्यापैकी सर्वात वयाने लहान कोण आहे? तुमच्यापैकी किती जण प्रथमच ऑलिंपिकमध्ये खेळत आहेत? इथे कोणाला 2 किंवा 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे?' "अनुभवी खेळाडूंनी आपले अनुभव आणि सल्ले ज्युनियर्ससोबत शेअर करावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी तिथलं वातावरण एका नव्या उत्साहाने भरलेलं होतं."
"पॅरिस ऑलिम्पिकच्या काही महिने अगोदर पंतप्रधान मोदींनी ॲथलीट्सना पत्रे पाठवली होती, आम्हाला कोणत्याही मदतीची गरज भासल्यास आपल्याकडे यावं असं त्यामध्ये म्हटलं होतं , त्यामुळे आमचं मनोबल वाढलं."
“पंतप्रधान मोदींनी मला आत्मविश्वास ठेव आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर असं सांगितलं. त्यांना प्रत्येक खेळाडूबद्दल तपशीलवार माहिती असते.”
“मी फक्त 16 वर्षांची होते तेव्हा पंतप्रधान मोदींनी मला मोठं ध्येय ठेवण्यासाठी प्रोत्साहित करून मला वैयक्तिक पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांच्याशी झालेल्या संवादावेळी मला बाजूला घेऊन ते म्हणाले, 'तू खूप लहान आहेस. तू आणखी मोठे यश मिळवशील आणि जेव्हा तुला कशाचीही गरज असेल तेव्हा थेट माझ्यापाशी येऊ शकतेस.' त्यांचं हे बोलणं मला फार मोठी प्रेरणा देणारं होतं."
“मला खरोखर पंतप्रधान मोदींशी बोलायला खूप आवडतं. मला सांगायचं आहे की जेव्हा मी पॅरिसहून परत आलो तेव्हा मी जी रॅकेट घेऊन खेळलो होतो,ती पंतप्रधान मोदींना देण्यासाठी सोबत नेली होती. माझ्याकडून रॅकेट घेतल्यावर त्यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी माझा सिग्नेचर बॅकहँड नो-लूक शॉट खेळायला सुरुवात केली. आणि त्यांनी मला विचारलं की तू असाच शॉट खेळतोस ना. त्यांचं एवढ्या बारकाईनं लक्ष असतं हे पाहून मी थक्क झालो. पंतप्रधान तुमच्या पाठीशी आहेत या जाणीवेनंच खूप छान वाटतं.”