olaf-scholz

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदनसर्वात प्रथम, माझे आणि आमच्या प्रतिनिधी मंडळाचे अतिशय उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी चान्सलर शोल्ज यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. यंदाच्या वर्षीचा माझा पहिला परदेश दौरा जर्मनीमध्ये होत आहे, याचा मला आनंद वाटतोय. या वर्षीच्या प्रारंभी ज्या विदेशी नेत्याबरोबर माझे पहिले दूरध्वनी संभाषण, ते माझे मित्र चान्सलर शोल्ज यांच्याबरोबर झाले होते. चान्सलर शोल्ज यांच्यासाठीही आजची भारत आणि जर्मनी ‘आयजीसी’ ही या वर्षामधली पहिली आयजीसी आहे. अशा विविध गोष्टी पहिल्यांदा होत आहेत, यावरून भारत आणि जर्मनी हे दोन्ही देश या महत्वपूर्ण भागीदारीला किती प्राधान्य देत आहेत, हेच दिसून येते. लोकशाहीवादी देश म्हणूनही भारत आणि जर्मनी यांच्यामध्ये अनेक मूल्ये सामाईक आहेत. या मूल्यांच्या आणि सामाईक हितांच्या आधारे गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांच्या व्दिपक्षीय संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
May 02, 2022