फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार ईमॅन्युएल बॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दहशतवादाला आळा, सायबर सुरक्षा, संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य यासह भारत- फ्रान्स धोरणात्मक भागीदारीतल्या महत्वाच्या मुद्याबाबत दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
सागरी आणि बहुपक्षीय सहकार्यासह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर भारत- फ्रान्स सहकार्याबाबत बॉन यांनी यावेळी माहिती दिली.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणाचे स्मरण पंतप्रधानांनी केले आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांना भारत भेटीसाठीच्या निमंत्रणाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
7 जानेवारी 2021 ला झालेल्या भारत-फ्रान्स धोरणात्मक चर्चेसाठी बॉन भारतात आले आहेत.