किफायतशीर सौर ऊर्जा क्षमता वृद्धीमधे अनिवासी भारतीयांची भूमिका यावरच्या प्रवासी भारतीय पॅनेल सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारतातल्या तसेच परदेशस्य भारतीय तज्ञ, शिक्षणतज्ञ, उद्योजक यांचा यात समावेश आहे. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात ऑफ ग्रीड, मायक्रोग्रीड तोडगा, अद्ययावत सौर तंत्रज्ञान, कल्पक वित्तीय पर्याय यावर गेल्या दोन दिवसात झालेल्या चर्चेची निष्पत्ती त्यांनी पंतप्रधानांना सादर केली.
या व्यवहार्य सूचनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले आणि त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश परराष्ट्र व्यवहार आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाला दिले.