जपानच्या संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. तोशिहिरो निकाई यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात मोटू हयाशी आणि तातसू हिरानो यांचा समावेश आहे.
सप्टेंबरमध्ये जपान-भारत संसद सदस्यांच्या मैत्री गटाबरोबर संवाद साधला होता त्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. उभय देशातल्या संसद सदस्यांमधल्या वाढत्या संवादाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. त्सुनामीच्या धोक्याबाबत जागृती वाढविण्यासाठी तोशिहिरो निकाई यांनी घेतलेल्या पुढाकाराची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. आपत्तीचा धोका कमी करण्याबाबत तसेच आपत्ती व्यवस्थापनात द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुढच्या आठवड्यात जपानला भेट देण्यासाठी आपण उत्सूक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.