सीपीएसईच्या धोरणात्मक निर्गुंतवणूकीवरील नीती आयोगाच्या चौथ्या टप्यातील शिफारशींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारा संदर्भातील केंद्रीय मंत्रिमंडळ समितेने मंजुरी दिली आहे. निर्गुंतवणूकीवरील सचिवांच्या कोअर गटाच्या शिफारशींच्या आधारवर या शिफारशी आहेत.
१. एअर इंडिया आणि तिच्या ५ नियंत्रित कंपन्यांमधून धोरणात्मक निर्गुंतवणूक करायला तत्वतः मंजुरी
२. वित्त मंत्र्यांसह नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या एअर इंडियाच्या विशिष्ट पर्यायी यंत्रणा या धोरणात्मक निर्गुंतवणूकीवर वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि खालील निर्णय घेतात:
अ. एअर इंडियाच्या अनिश्चित कर्जावर उपाय
ब. शेल कंपनीला काही संपत्ती देणे;
क. नफा कमवणाऱ्या तीन कंपन्या वेगवेगळ्या करून धोरणात्मक निर्गुंतवणूक करणे
ड. निर्गुंतवणुकीचे प्रमाण