पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच(प्रक्षेपण) पॅड स्थापित  करण्यास मान्यता देण्यात आली.

श्रीहरीकोटा येथे, तिसऱ्या लाँच पॅड प्रकल्पात दुसऱ्या लाँच पॅडसाठी स्टँडबाय लाँच पॅड म्हणून साहाय्य प्रदान करणे तसेच  इस्रोच्या पुढच्या अद्ययावत प्रक्षेपकांसाठी आवश्यक प्रक्षेपण पायाभूत सुविधा स्थापित करणे, अभिप्रेत आहे. यामुळे भविष्यातील भारतीय मानवी अंतराळ मोहिमांसाठी  प्रक्षेपण क्षमतादेखील वृद्धिंगत होईल.

हा प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे:

शक्य तितकी सार्वत्रिक आणि वापरयोग्य धाटणी (कॉन्फिगरेशन ), जी केवळ एनजीएलव्हीच नव्हे तर सेमीक्रायोजेनिक स्टेजसह एलव्हीएम-3 वाहनांना तसेच एनजीएलव्हीच्या स्केल अप कॉन्फिगरेशनला देखील साहाय्यभूत होऊ शकेल, अशा प्रकारे या तिसऱ्या लाँच पॅड  योजनेचे आरेखन करण्यात आले आहे. अधिकाधिक उद्योग सहभागाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जाईल. इस्रोचा  पूर्वीचे लाँच पॅड स्थापित करण्यात असलेला अनुभव आणि आणि विद्यमान प्रक्षेपण संकुल सुविधा यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जाईल.

48 महिने किंवा  4 वर्षे या कालावधीत तिसरे लाँच पॅड स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

खर्च :

यासाठी एकूण 3984.86कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून यात लाँच पॅडची स्थापना आणि संलग्न सुविधांचा समावेश आहे.

लाभ :

यामुळे देशाला अधिकाधिक प्रक्षेपणे शक्य होऊन मानवी अंतराळ उड्डाणे आणि अंतराळ शोध मोहीम हाती घेण्याची राष्ट्रीय क्षमता वृद्धिंगत करणे शक्य होईल. अशा प्रकारे  हा प्रकल्प भारतीय अंतराळ परिसंस्थेला चालना देईल.

पार्श्वभूमी:

भारतीय अवकाश वाहतूक प्रणाली आत्तापर्यंत पूर्णपणे फर्स्ट लॉन्च पॅड (एफएलपी) आणि सेकंड लॉन्च पॅड (एसएलपी) या दोन प्रक्षेपण पॅडवर अवलंबून होती. पीएसएलव्हीसाठी 30 वर्षांपूर्वी एफएलपी बांधण्यात आले होते. पीएसएलव्ही आणि एसएसएलव्ही प्रक्षेपणासाठी याच पॅडचा वापर अजूनही केला जात आहे. एसएलपीचा वापर प्रामुख्याने जीएसएलव्ही आणि एलव्हीएम 3 साठी केला जातो. हे पॅड पीएसएलव्हीसाठी गरज भासली तर वापरता येते. एसएलपी जवळजवळ 20 वर्षांपासून कार्यरत आहे. चांद्रयान-3 मिशनसारख्या राष्ट्रीय मोहिमांसह पीएसएलव्ही/ एलव्हीएम3 अशा काही व्यावसायिक मोहिमांमध्ये अधिक चांगल्या रितीने उड्डाणासाठीची प्रक्षेपण क्षमता या पॅडमुळे वाढली आहे. एसएलपी देखील गगनयान मोहिमेसाठी मानवी मानांकित एलव्हीएम3 प्रक्षेपणासाठी सज्ज होत आहे.

2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्थानक (बीएएस) आणि 2040 पर्यंत भारतीय क्रूड लूनर लँडिंगसह अमृत काळादरम्यान भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या विस्तारासाठी नवीन प्रोपल्शन सिस्टमसह जड प्रक्षेपण वाहनांच्या नव्या आवृत्तीची आवश्यकता आहे, सध्याच्या प्रक्षेपणाद्वारे ही गरज पूर्ण केली जाऊ शकत नाही. पॅड नेक्स्ट जनरेशन लॉन्च हेव्ही व्हेईकल्ससाठी आणि एसएलपीसाठी गरजेप्रमाणे तिसरा लाँच पॅड तातडीने उभारण्याची गरज आहे. त्यामुळे आणखी 25-30 वर्षांपर्यंत अंतराळ वाहतुकीच्या गरजा पूर्ण करता येतील.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
'Goli unhone chalayi, dhamaka humne kiya': How Indian Army dealt with Pakistani shelling as part of Operation Sindoor

Media Coverage

'Goli unhone chalayi, dhamaka humne kiya': How Indian Army dealt with Pakistani shelling as part of Operation Sindoor
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 मे 2025
May 20, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Vision in Action: Transforming India with Infrastructure and Innovation