आंध्रप्रदेश मधे ‘आंध्रप्रदेश केंद्रीय विद्यापीठ’ या नावाने, अनंतपुर जिल्ह्यात जनथालुरू इथे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे.या विद्यापीठाच्या उभारणीच्या पहिल्या टप्प्याच्या खर्चासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय विद्यापीठ, अस्थाई परिसरातून कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
या मंजुरीमुळे उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या संधीत वाढ होणार असून दर्जात्मक वाढ अपेक्षित आहे. याचबरोबर प्रादेशिक असमतोल कमी व्हायला मदत होणार आहे. आंध्रप्रदेश पुनर्गठन कायदा 2014 च्या प्रभावी अंमलबजावणीला यामुळे मदत होणार आहे.