पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयटी हार्डवेअर अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी लागणाऱ्या हार्डवेअर निर्मिती क्षेत्राला उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना 2.0 ला मंजुरी देण्यात आली.
संदर्भ:
- गेल्या आठ वर्षांत भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात 17 टक्के सीएजीआरसह सातत्यपूर्ण वाढ झाली आहे. या वर्षी या क्षेत्राने उत्पादनात 105 अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे 9 लाख कोटी रुपये) चा एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला -
- भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. मोबाइल फोनच्या निर्यातीने या वर्षी 11 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 90 हजार कोटी रुपये) मोठा टप्पा ओलांडला.
- जागतिक इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती परिसंस्था भारतात येत आहे आणि भारत एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक देश म्हणून उदयास येत आहे
- मोबाइल फोनसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या (पीएलआय) यशाच्या आधारे केंद्रीय मंत्रिमंडळाने आयटी हार्डवेअर या क्षेत्रासाठी पीएलआय योजना 2.0 ला आज मान्यता दिली.
ठळक वैशिष्ट्ये :
- आयटी हार्डवेअर या क्षेत्रासाठी पीएलआय योजना 2.0 मध्ये लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी, सर्व्हर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर डिव्हाइसचा समावेश आहे.
- या योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 17,000 कोटी रुपये आहे.
- या योजनेचा कालावधी 6 वर्षांचा आहे.
- अपेक्षित वाढीव उत्पादन 3.35 लाख कोटी रुपये
- अपेक्षित वाढीव गुंतवणूक 2,430 कोटी रुपये
- अपेक्षित वाढीव थेट रोजगार 75,000
महत्व
- भारत सर्व जागतिक कंपन्यांसाठी विश्वासू पुरवठा साखळी भागीदार म्हणून उदयास येत आहे. मोठमोठ्या आयटी हार्डवेअर कंपन्यांनी भारतात उत्पादन सुविधा उभारण्यात रस दाखवला आहे. देशांतर्गत चांगली मागणी असलेल्या मजबूत आयटी सेवा उद्योगामुळे याला आणखी बळ मिळाले आहे.
बहुतांश प्रमुख कंपन्या भारतात असलेल्या उत्पादन सुविधेतून देशांतर्गत बाजारपेठांना पुरवठा करू इच्छितात तसेच भारताला निर्यात केंद्र बनवू इच्छितात.