पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण रु. 24,104 कोटी (केंद्रसरकार: रु. 15,336 कोटी आणि राज्यसरकार: रु. 8,768 कोटी) रुपये खर्चाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाला (पीएम-जनमन) मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 9 मंत्रालयांच्या माध्यमातून 11 महत्वाच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाईल. पंतप्रधानांनी आदिवासी गौरव दिनानिमित्त खुंटी येथून या अभियानाची घोषणा केली होती.

2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केल्याप्रमाणे, ‘विशेषतः वंचित आदिवासी समूहांच्या (पीव्हीटीजी) सामाजिक-आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास मिशन सुरु केले जाईल.या अभियानामुळे पीव्हीटीजी कुटुंबे आणि वस्त्या सुरक्षित घरे, पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, रस्ते आणि दूरसंचार संपर्क आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी यासारख्या मुलभूत सुविधांनी परिपूर्ण होतील. अनुसूचित जमातींसाठीच्या विकास कृती आराखड्या (डीएपीएसटी) अंतर्गत पुढील तीन वर्षांत मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी रु. 15,000 कोटी उपलब्ध करून दिले जातील.

2011 च्या जनगणनेनुसार भारतामधील अनुसूचित जमातींची (एसटी) लोकसंख्या 10.45 कोटी आहे, त्यापैकी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर वसलेल्या 75 समुदायांना, विशेष वंचित आदिवासी समूह (पीव्हीटीजी) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. हा पीव्हीटीजी गट सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये आजही असुरक्षित आहे.

पीएम-जनमन (केंद्रीय क्षेत्र आणि केंद्र प्रायोजित योजनांचा समावेश) आदिवासी विकास मंत्रालयासह 9 मंत्रालयांच्या माध्यमातून 11 महत्वाच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करेल. तपशील पुढील प्रमाणे:

S.No.

Activity

No. of Beneficiary / Targets

Cost norms

1

Provision of pucca houses

4.90 lakh

Rs 2.39 lakhs /house

2

Connecting roads

8000 KM

Rs 1.00 Cr/Km

3a

Piped Water Supply/

All PVTG habitations including 4.90 lakhs HHs to be constructed under the mission

As per schematic norms

3b

Community water supply

2500 Villages/ habitations with population of less than 20 HHs

As per actual cost arrived

4

Mobile Medical Units with medicine cost

1000 (10/district)

Rs 33.88.00 lakhs/MMU

5a

Construction of hostels

500

Rs 2.75 Cr/hostel

5b

Vocational education & skilling

60 Aspirational PVTG blocks

Rs 50 lakhs/block

6

Construction of Anganwadi Centers

2500

Rs 12 lakhs/AWC

7

Construction of Multipurpose Centers (MPC)

1000

Rs 60 lakhs/MPC Provision of ANM and Anganwadi worker in each MPC

8a

Energization of HHs (Last mile connectivity)

57000 HHs

Rs 22,500/HH

8b

Provision of 0.3 KW solar off-grid system

100000 HHs

Rs 50,000/HH or as per actual cost

9

Solar lighting in streets & MPCs

1500 units

Rs 1,00,000/unit

10

Setting up of VDVKs

500

Rs 15 lakhs/VDVK

11

Installation of mobile towers

3000 villages

As per schematic norms cost

वर नमूद केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त, या मिशन मध्ये इतर मंत्रालयांच्या पुढील कार्यक्रमांचा समावेश असेल:

  1. आयुष मंत्रालय सध्या लागू असलेल्या नियमांनुसार आयुष निरामयता सेंटरची स्थापना करेल आणि फिरत्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून, पीव्हीटीजी वस्त्यांना आयुष सुविधांचा लाभ दिला जाईल.
  2. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पीव्हीटीजी वस्त्या, बहुउद्देशीय केंद्रे आणि वसतिगृहांमध्ये या समुदायांकडे असलेली कौशल्य लक्षात घेऊन, त्या अनुषंगाने त्यांना कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण देईल.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report

Media Coverage

India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to participate in ‘Odisha Parba 2024’ on 24 November
November 24, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the ‘Odisha Parba 2024’ programme on 24 November at around 5:30 PM at Jawaharlal Nehru Stadium, New Delhi. He will also address the gathering on the occasion.

Odisha Parba is a flagship event conducted by Odia Samaj, a trust in New Delhi. Through it, they have been engaged in providing valuable support towards preservation and promotion of Odia heritage. Continuing with the tradition, this year Odisha Parba is being organised from 22nd to 24th November. It will showcase the rich heritage of Odisha displaying colourful cultural forms and will exhibit the vibrant social, cultural and political ethos of the State. A National Seminar or Conclave led by prominent experts and distinguished professionals across various domains will also be conducted.