भारत- आफ्रिका फोरम परिषदेतल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आफ्रीकेत, 2018- 2021 या चार वर्षाच्या काळासाठी 18 नवे भारतीय मिशन सुरु करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
बुर्कीनो फासो, केमेरून, केप व्हर्दे, शाड, रिपब्लिक ऑफ काँगो, जिबूती, ईक्विटो रिअलगिनी, एरिट्रिया, गिनी, गिनी बिसाउ, लायबेरिया, मोरीटोनिया, रवांडा, साओ टोम आणि प्रिन्सिपे, सियरा लिओन, सोमालिया, स्वाझीलंड, टोगो या 18 ठिकाणी नवे भारतीय मिशन उघडण्यात येतील.2018- 2021 या चार वर्षाच्या काळासाठी ही मिशन उघडण्यात येणार असून त्यामुळे निवासी भारतीय मिशनची संख्या वाढून ती 29 वरून 47 होणार आहे.
या निर्णयामुळे आर्फ्रिका खंडात भारताचीराजनैतिक व्याप्ती वाढणार असून आफ्रिकन देशातल्या भारतीय समूहाला संपर्क करणे सुलभ होणार आहे.नवी मिशन सुरु करणे म्हणजे आफ्रिकेसमवेत विस्तृत सहकार्य करण्याच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.