पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने बिहारच्या पटणामधील बिहटा येथे 1413 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करण्याच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
हा पायाभूत सुविधा प्रकल्प पटणा विमानतळाची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरण पटणा विमानतळावर एक नवीन टर्मिनल इमारत बांधण्याच्या प्रक्रियेत आहे आणि मर्यादित जमिनीच्या उपलब्धतेमुळे पुढील विस्ताराला अडथळा निर्माण झाला आहे.
बिहटा विमानतळावरील प्रस्तावित नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा परिसर 66,000 चौरस मीटर असून वार्षिक 50 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता तर गर्दीच्या वेळी 3000 प्रवाशांना सामावून घेण्याच्या दृष्टीने याची रचना केली आहे.जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ही क्षमता आणखी 50 लाखांनी वाढवली जाईल आणि अंतिम क्षमता वार्षिक एक कोटी प्रवासी इतकी असेल. प्रकल्पाच्या प्रमुख घटकांमध्ये A-321/B-737-800/A-320 प्रकारच्या विमानांसाठी योग्य 10 पार्किंग बे तसेच दोन लिंक टॅक्सीवे सामावून घेण्यास सक्षम अशा ऍप्रनचे बांधकाम समाविष्ट आहे.
Increased air connectivity is great news for tourism and commercial growth. The Cabinet today has approved new civilian enclaves at Bagdogra in West Bengal and Bihta in Bihar. This will ensure seamless travel to and from these places. pic.twitter.com/OfJA2B3of3
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2024