भारतात एक मजबूत नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेला चालना देण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब
भारताच्या जागतिक स्पर्धात्मकतेत वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाच्या अखत्यारीतील अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या प्रमुख उपक्रमाला कामाच्या वाढीव व्याप्तीसह आणि 2,750 कोटी रुपये तरतुदीसह 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी  दिली आहे.

एआयएम 2.0 हे विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल आहे. भारताच्या ऊर्जाशील नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेचा विस्तार करणे, मजबूत करणे आणि वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.

या मंजुरीमुळे भारतात एका मजबूत नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेला  चालना देण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारत 39व्या क्रमांकावर असून जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था असलेला देश आहे. अटल इनोव्हेशन मिशन (AIM 2.0) च्या पुढील टप्प्यात भारताची जागतिक स्पर्धात्मकता आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. अटल इनोव्हेशन मिशन सुरु ठेवल्यामुळे ते उत्तम नोकऱ्या, अभिनव उत्पादने आणि सर्व क्षेत्रांमध्ये उच्च-प्रभावी सेवा निर्माण करण्यात मोठी मदत होईल.

एआयएम 1.0 मधील अटल टिंकरिंग लॅब आणि अटल इनक्युबेशन सेंटर्सच्या यशाच्या आधारे पुढे मार्गक्रमण करताना  एआयएम 2.0 मिशनच्या दृष्टिकोनात दर्जात्मक बदल दिसून येईल. एआयएम 1.0 मध्ये भारताच्या तत्कालीन नवख्या  परिसंस्थेला बळकट करण्यासाठी अत्याधुनिक संशोधनासाठी नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती करणाऱ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी समाविष्ट होती तर एआयएम 2.0 मध्ये परिसंस्थेतील त्रुटी भरून काढण्यासाठी डिझाइन केलेले नवीन उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर चालवणे आणि केंद्र आणि राज्य सरकार, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र आणि समुदाय यांच्या मदतीने  यश मिळवणे समाविष्ट आहे. 

एआयएम 2.0 ची रचना तीन प्रकारे भारतातील नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने केली आहे: (a) इनपुट वाढवणे  (म्हणजे अधिकाधिक नवोदित आणि उद्योजकांना मार्गदर्शन करणे), (b) यशाचा दर  किंवा 'थ्रूपुट' सुधारणे (म्हणजे, अधिक स्टार्टअप्सना यशस्वी होण्यासाठी मदत करणे) आणि (c) 'आउटपुट' ची गुणवत्ता सुधारणे (म्हणजे, उत्तम नोकऱ्या, उत्पादने आणि सेवा निर्माण करणे).

दोन कार्यक्रमात  परिसंस्थेत  इनपुट वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे :

  • नवोन्मेष संबंधी  भाषा समावेशक कार्यक्रम (LIPI) चे उद्दिष्ट भारतातील 22 अनुसूचित भाषांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्था तयार करणे आहे जेणेकरून इंग्रजी बोलू न शकणाऱ्या नवोदित, उद्योजक आणि गुंतवणूकदारांसमोरील अडथळे कमी करता येतील. विद्यमान इनक्यूबेटरमध्ये 30 व्हर्नाक्युलर इनोव्हेशन सेंटर्सची स्थापना केली जाईल.T
  • फ्रंटियर कार्यक्रम जम्मू आणि काश्मीर, लडाख, ईशान्येकडील राज्ये, आकांक्षी जिल्हे आणि तालुक्यांमध्ये नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेसाठी सानुकूलित टेम्पलेट्स तयार करेल जिथे  भारतातील 15% नागरिक राहतात. टेम्प्लेट विकसित करण्यासाठी 2500 नवीन अटल टिंकरिंग लॅब्स निर्माण केल्या जातील. 

परिसंस्थेच्या थ्रूपुटमध्ये सुधारणा करण्याचे चार कार्यक्रमांचे उद्दिष्ट :

  • मानव भांडवल विकास कार्यक्रम हा भारतात नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्थेची निर्मिती, संचालन  आणि देखरेख करण्यासाठी व्यावसायिक (व्यवस्थापक, शिक्षक, प्रशिक्षक) तयार करण्यासाठी एक प्रणाली तयार करेल. पायलट अशा 5500 व्यावसायिकांना तयार करेल.
  • संशोधन-आधारित डीप टेक स्टार्टअप्सचे व्यावसायिकीकरण करण्याच्या पद्धतींच्या परीक्षणासाठी डीपटेक अणुभट्टी संशोधन सँडबॉक्स तयार करेल ज्यांना बाजारात येण्यासाठी बराच  वेळ आणि मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. किमान 1 डीपटेक अणुभट्टी संचालित केली जाईल.
  • राज्य नवोन्मेष  मिशन एक मजबूत नवोन्मेष आणि उद्योजकता इकोसिस्टम तयार करण्यात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मदत करेल जे  त्यांच्या सामर्थ्याच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील.  राज्य नवोन्मेष  मिशन हे नीती आयोगाच्या राज्य सहायता अभियानाचा एक घटक असेल.
  • भारताच्या नवोन्मेष  आणि उद्योजकता परिसंस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय नवोन्मेष सहकार्य कार्यक्रमअंतर्गत हस्तक्षेपासाठी चार क्षेत्रे निवडली आहेत : (a) वार्षिक जागतिक  टिंकरिंग ऑलिम्पियाड, (b) प्रगत राष्ट्रांसह 10 द्वि-पक्षीय, बहुपक्षीय संबंधांची स्थापना, (c) ज्ञान भागीदार म्हणून, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेला  प्रसार करण्यास मदत करणे, ग्लोबल साऊथ देशांसाठी एआयएम आणि त्याच्या कार्यक्रम (ATL, AIC) च्या मॉडेलचा प्रसार करणे आणि (d) भारतासाठी जी-20 च्या स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाला अधिक बळकट करणे.

आउटपुटची गुणवत्ता (नोकरी, उत्पादने आणि सेवा) सुधारण्याचे दोन कार्यक्रमांचे उद्दिष्ट :

  • प्रगत स्टार्टअपना पुढे नेण्यात उद्योगाचा सहभाग वाढवण्यासाठी औद्योगिक प्रवेगक कार्यक्रमअंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर महत्वपूर्ण  क्षेत्रात किमान 10 उद्योग प्रवेगक तयार केले जातील.
  • अटल सेक्टोरल इनोव्हेशन लॉन्चपॅड्स (ASIL) कार्यक्रम प्रमुख उद्योग क्षेत्रातील स्टार्टअप्सकडून एकीकरण आणि खरेदी करण्यासाठी केंद्रीय मंत्रालयांमध्ये iDEX सारखे प्लॅटफॉर्म तयार करेल. महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये किमान 10 लाँचपॅड निर्माण केले  जातील.

 

  • The Atal Sectoral Innovation Launchpads (ASIL) program to build iDEX-like platforms in central ministries for integrating and procuring from startups in key industry sectors. Minimum 10 launchpads will be built across key ministries.
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Income inequality declining with support from Govt initiatives: Report

Media Coverage

Income inequality declining with support from Govt initiatives: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella meets Prime Minister, Shri Narendra Modi
January 06, 2025

Chairman and CEO of Microsoft, Satya Nadella met with Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi.

Shri Modi expressed his happiness to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. Both have discussed various aspects of tech, innovation and AI in the meeting.

Responding to the X post of Satya Nadella about the meeting, Shri Modi said;

“It was indeed a delight to meet you, @satyanadella! Glad to know about Microsoft's ambitious expansion and investment plans in India. It was also wonderful discussing various aspects of tech, innovation and AI in our meeting.”