पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने पंजाब आणि हरियाणा राज्यात राष्ट्रीय महामार्ग (मूळ) अंतर्गत हायब्रिड ऍन्युइटी मोड वर राष्ट्रीय महामार्ग-7 (झिरकपूर-पटियाला) जंक्शनपासून सुरू होणारा आणि राष्ट्रीय महामार्ग-5 (झिरकपूर-परवाणू) जंक्शनवर संपणारा 19.2 किमी लांबीचा 6 पदरी झिरकपूर बायपास बांधण्यास मान्यता दिली आहे. हा प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा तत्त्वानुसार एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 1878.31 कोटी रुपये आहे.
झिरकपूर बायपास हा राष्ट्रीय महामार्ग-7 (चंदीगड-भटिंडा) जंक्शनपासून सुरू होतो आणि पंजाबमधील पंजाब सरकारच्या बृहद् आराखड्याचे अनुसरण करून हरियाणाच्या पंचकुलामध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 (झिरकपूर-परवाणू) जंक्शनवर संपतो, अशा प्रकारे पंजाबमधील राष्ट्रीय महामार्ग-5 (झिरकपूर-परवाणू) आणि हरियाणाच्या पंचकुलाचा अत्यंत शहरीकरण झालेला आणि गर्दीचा भाग टाळला जातो.
झिरकपूर, पंचकुला आणि आसपासच्या भागातील वाहतूक कमी करून पटियाला, दिल्ली, मोहाली एरोसिटी येथून वाहतूक वळवणे आणि हिमाचल प्रदेशला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. प्रवासाचा वेळ कमी करणे आणि राष्ट्रीय महामार्ग-7, राष्ट्रीय महामार्ग-5 आणि राष्ट्रीय महामार्ग-152 च्या गर्दीच्या शहरी भागात वाहतूक अडथळामुक्त करणे हा सध्याच्या प्रस्तावाचा उद्देश आहे.
सरकारने चंदीगड, पंचकुला आणि मोहाली शहरी समूहातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे काम हाती घेतले आहे आणि रस्ते नेटवर्क विकसित केले आहे जे नकाशात दर्शविल्याप्रमाणे रिंग रोडचे रूप घेईल. झिरकपूर बायपास हा या योजनेचा एक महत्त्वाचा घटक आहे.
Cabinet approval for the construction of the 6-lane Zirakpur Bypass will reduce travel time and also improve connectivity to Himachal Pradesh and NCR. It is also in line with our PM GatiShakti effort to build seamless, future-ready transport infrastructure.…
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2025