पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा (DA) अतिरिक्त हप्ता आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत (DR) जारी करण्यास मंजुरी दिली आहे. ही सवलत 1.1.2024 पासून लागू करण्यात आली आहे. भाव वाढीची भरपाई करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ही सवलत मूळ वेतन किंवा निवृत्तीवेतनाच्या 46% म्हणजे विद्यमान दरापेक्षा 4% ची वाढ दर्शविते.
महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हींमुळे एकत्रित परिणाम म्हणून प्रतिवर्ष 12,868.72 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून अतिरिक्त खर्च होणार आहेत. याचा फायदा सुमारे 49.18 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्तीवेतन धारकांना होणार आहे.
ही वाढ 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे.