Travel time between Agra and Gwalior will be reduced by 50%
Kharagpur - Moregram corridor to transform the economy of West Bengal and North-East
Highway networks around Kanpur to be decongested by Kanpur Ring Road
Unlocking growth of Jharkhand and Chhattisgarh through completion of Raipur Ranchi Corridor
The new corridor between Tharad and Ahmedabad to complete the High Speed Road Network in Gujarat for seamless port connectivity and reduced logistics cost
The Guwahati ring road to facilitate un-hindered access to North-East
Travelling to Ayodhya will be much faster now
8-Lane elevated flyover corridor section between Pune and Nashik will eliminate logistics nightmare

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक  मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी  रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. . या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे  4.42 कोटी मनुष्यदिवस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

प्रकल्पांबाबत संक्षिप्त माहिती :

1. 6-पदरी  आग्रा - ग्वाल्हेर राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:

88-किमीचा  हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर  पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित 6-पदरी  कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाईल आणि यासाठी  4,613 कोटी रुपये  एकूण भांडवली खर्च येईल.

2.  4-पदरी  खरगपूर - मोरेग्राम राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:

खरगपूर आणि मोरेग्राम दरम्यान 231-किमीचा  4-पदरी प्रवेश-नियंत्रित हाय-स्पीड कॉरिडॉर हा हायब्रीड ॲन्युइटी मोड वर  विकसित केला जाईल. याचा एकूण भांडवली खर्च 10,247 कोटी रुपये आहे.

3. 6-पदरी थरड - दिसा  - मेहसाणा - अहमदाबाद राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर:

214-किमीचा  6-पदरी  हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा - वापरा  - हस्तांतरित करा तत्वावर 10,534 कोटी रुपये  एकूण  भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. 10,534 कोटी.

4. 4-पदरी  अयोध्या रिंग रोड:

68-किमीचा  4-पदरी  प्रवेश-नियंत्रित अयोध्या रिंगरोड हा हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये 3,935 कोटी रुपये एकूण  भांडवली खर्चासह विकसित केला जाईल. .

5. रायपूर-रांची राष्ट्रीय  हायस्पीड कॉरिडॉरचा पथलगाव आणि गुमला दरम्यान 4-पदरी खंड :

रायपूर - रांची कॉरिडॉरचा 137-किमीचा  4-पदरी  प्रवेश-नियंत्रित पथलगाव - गुमला खंड  हायब्रीड ॲन्युइटी मोड मध्ये विकसित केला जाईल. संपूर्ण कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी 4,473 कोटी रुपये एकूण भांडवली खर्च येईल.

6. 6-पदरी कानपूर रिंग रोड:

कानपूर रिंगरोडचा 47-किमीचा 6-पदरी प्रवेश-नियंत्रितखंड अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम पद्धतीने  एकूण. 3,298 कोटी रुपये भांडवली खर्चासह विकसित केला जाईल.

7. 4- पदरी उत्तर गुवाहाटी बायपास आणि विद्यमान गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण/सुधारणा:

121-किमीचा  गुवाहाटी रिंगरोड बांधा, वापरा, टोल  (बीओटी) मोडमध्ये विकसित केला जाईल. यासाठी एकूण भांडवली खर्च 5,729 कोटी रुपये येईल.

8. पुण्याजवळ 8-पदरी उन्नत  नाशिक फाटा - खेड कॉरिडॉर:

पुण्याजवळ नाशिक फाटा ते  खेड दरम्यान  30-किमीचा  8-पदरी उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा -हस्तांतरित करा तत्वावर विकसित केला जाईल. यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल. उन्नत कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून जाणाऱ्या /येणाऱ्या वाहतुकीसाठी वेगवान हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या कॉरिडॉरमुळे पिंपरी-चिंचवडमधील मोठी वाहतूक कोंडी  कमी होणार आहे.

नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंच्या 2 पदरी  सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे 4/6  पदरी रस्त्यात रूपांतर करण्यासह सिंगल पिलरवर  टियर  - 1 वर 8 पदरी उन्नत उड्डाणपूल महाराष्ट्र राज्यातील NH-60 च्या खंड  (Pkg-1: from km 12.190 to km 28.925 & Pkg-2: from km 28.925 to km 42.113) वर बांधण्यात येईल.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi