पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबतच्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत.
एकाचवेळी निवडणुका: उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी
- 1951 ते 1967 या काळात एकाच वेळी निवडणुका घेण्यात आल्या.
- विधी आयोग: 170 वा अहवाल (1999): पाच वर्षांत लोकसभा आणि सर्व विधानसभांसाठी एक निवडणूक.
- संसदीय समितीचा 79 वा अहवाल (2015): एकाचवेळी दोन टप्प्यात निवडणुका घेण्यासाठीची पद्धत सुचवली.
- रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने राजकीय पक्ष आणि तज्ञांसह व्यापक स्तरावर सर्व संबंधितांशी विस्तृत चर्चा केली.
- हा अहवाल https://onee.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे
- यावर मिळालेल्या भरघोस प्रतिक्रियांमधून देशात एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी व्यापक पाठिंबा असल्याचे दिसून येते.
शिफारशी आणि पुढील मार्गक्रमण
- दोन टप्प्यात अंमलबजावणी
- पहिला टप्पा : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे
- दुसरा टप्पा : सार्वत्रिक निवडणुकांच्या 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (पंचायत आणि नगरपालिका) निवडणुका घेणे
- सर्व निवडणुकांसाठी सामायिक मतदार यादी.
- देशभरात सविस्तर चर्चा सुरू करणार.
- अंमलबजावणी गट तयार करणे.
The Cabinet has accepted the recommendations of the High-Level Committee on Simultaneous Elections. I compliment our former President, Shri Ram Nath Kovind Ji for spearheading this effort and consulting a wide range of stakeholders.
— Narendra Modi (@narendramodi) September 18, 2024
This is an important step towards making our…