ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
नुकत्याच झालेल्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा उभय नेत्यांनी परस्परांना दिल्या.
विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा यासह इतर क्षेत्रातही द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करायला वाव असल्याचे उभय नेत्यांनी मान्य केले. पुढच्या आठवडयात पंतप्रधान मे यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करायला आपण उत्सूक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
British Prime Minister, Theresa May speaks to PM Modi on telephone
Both leaders agreed upon scope for strengthening bilateral cooperation between the two nations