भारतीय जनता पार्टी हा भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून संपूर्ण देशभरात त्याचे सक्रिय अस्तित्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भाजप प्रणित NDA सरकारने शेतकरी, गरीब, उपेक्षित, तरुण, महिला आणि नव-मध्यम वर्गाच्या आकांक्षा पूर्ण करून सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख शासनाच्या युगाचा प्रारंभ केला.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपने तिसऱ्यांदा जनादेश मिळवण्याचा विक्रम केला. श्री मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आर्थिक सुधारणा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी कार्यक्रमांना पक्षाने दिलेले प्राधान्य यशाला कारणीभूत ठरले आहे.

श्री नरेंद्र मोदी 2024 मध्ये राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेताना

याआधी पंतप्रधान मोदींनी 2019 आणि 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तीन दशकांनंतर स्वबळावर बहुमत मिळवणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला. ही कामगिरी करणारा तो पहिला काँग्रेसेतर पक्ष आहे.

श्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेताना

भाजपला 1980 च्या दशकापासूनचा इतिहास आहे, जेव्हा श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचा जन्म झाला होता. भाजपचा पूर्वाश्रमीचा, भारतीय जनसंघ, 1950, 60 आणि 70 च्या दशकात भारतीय राजकारणात सक्रिय होता आणि त्याचे नेते श्री श्यामा प्रसाद मुखर्जी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री होते. जनसंघ 1977 ते 1979 या काळात श्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारचा अविभाज्य भाग होता. भारताच्या इतिहासातील ते पहिले काँग्रेसेतर सरकार होते.

BJP: For a strong, stable, inclusive& prosperous India

श्री लालकृष्ण अडवाणी, श्री अटलबिहारी वाजपेयी आणि श्री मुरली मनोहर जोशी नवी दिल्ली येथे भाजपच्या बैठकीत

आपल्या प्राचीन संस्कृतीतून आणि आचारविचारांपासून प्रेरणा घेणारा सशक्त, स्वावलंबी, सर्वसमावेशक आणि समृद्ध भारत निर्माण करणे हा भाजपचा निर्धार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या 'अखंड मानवतावाद' या तत्त्वज्ञानातून पक्षाने बरीच प्रेरणा घेतली आहे. भाजपला भारतीय समाजातील प्रत्येक घटकाचा, विशेषत: भारतातील तरुणांचा पाठिंबा मिळत आहे.

तुलनेने अगदी कमी कालावधीत, भारताच्या राजकीय प्रणालीत भाजप ही एक महत्त्वाची शक्ती बनली आहे. 1989 मध्ये (त्याच्या स्थापनेपासून 9 वर्षांनी), लोकसभेतील पक्षाच्या खासदारांची संख्या 2 (1984 मध्ये) वरून 86 वर पोहोचली आणि भाजप काँग्रेसविरोधी चळवळीच्या केंद्रस्थानी आला, त्याची परिणती राष्ट्रीय आघाडी स्थापन होण्यात झाली. जिने 1989-1990 या काळात भारतावर राज्य केले. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली त्यानंतर 1990 च्या दशकात पक्षाच्या यशाची मालिका सुरूच राहिली. 1991 मध्ये, तो लोकसभेतील मुख्य विरोधी पक्ष बनला, ही तुलनेने नव्या असलेल्या पक्षाच्यादृष्टीने उल्लेखनीय कामगिरी होती.

bjp-namo-in3

भाजप नेते नवी दिल्ली येथे पक्षाच्या बैठकीत

1996 च्या उन्हाळ्यात, श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, संपूर्ण गैर-काँग्रेस पार्श्वभूमी असलेले ते पहिले पंतप्रधान होते. 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत भाजपने जनतेचा कौल प्राप्त केला आणि श्री वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 1998 पासून 2004 पर्यंत सहा वर्षे त्याने देशाचा कारभार चालवला. श्री वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आजही त्यांनी हाती घेतलेल्या विकास उपक्रमांमुळे स्मरणात आहे ज्यांनी भारताला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेले.

bjp-namo-in2

श्री अटलबिहारी वाजपेयी नवी दिल्ली येथे पंतप्रधानपदाची शपथ घेताना

श्री नरेंद्र मोदी यांनी 1987 मध्ये मुख्य प्रवाहातील राजकारणात उडी घेतली आणि एका वर्षात ते गुजरात भाजपचे सरचिटणीस बनले. 1987 ची न्याय यात्रा आणि 1989 मधील लोकशक्ती यात्रेच्या आयोजनात त्यांचे संघटनात्मक कौशल्य दिसून आले. गुजरातमध्ये भाजप प्रथम 1990 मध्ये अल्प कालावधीसाठी आणि नंतर 1995 पासून आजपर्यंत सत्तेवर येण्यात या प्रयत्नांनी महत्त्वाची भूमिका बजावली. श्री मोदी 1995 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव बनले आणि 1998 मध्ये त्यांच्याकडे पक्ष संघटनेतील एका महत्त्वपूर्ण पदाची, सरचिटणीस (संघटन) पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तीन वर्षांनंतर, 2001 मध्ये, पक्षाने त्यांच्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. 2002, 2007 आणि 2012 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.

भाजपबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, पक्षाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

भारतीय जनता पार्टीचे X अकाउंट

श्री लालकृष्ण अडवाणीजी यांचे संकेतस्थळ

श्री राजनाथ सिंह यांचे संकेतस्थळ

राजनाथ सिंह यांचे X अकाउंट

श्री नितीन गडकरी यांचे संकेतस्थळ

श्री नितीन गडकरी यांचे X अकाउंट

 

भाजपचे मुख्यमंत्री

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे X अकाउंट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे X अकाउंट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संकेतस्थळ

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांचे संकेतस्थळ

एन. बिरेन सिंग यांचे X अकाउंट

गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांचे X अकाउंट

आसामचे मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा यांचे X अकाउंट

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे X अकाउंट

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे संकेतस्थळ

भूपेंद्र पटेल यांचे X अकाउंट

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचे X अकाउंट

विष्णू देव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड यांचे X अकाउंट

डॉ मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश यांचे X अकाउंट

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे X अकाउंट

नायब सैनी, मुख्यमंत्री, हरियाणा यांचे संकेतस्थळ

नायब सैनी, मुख्यमंत्री, हरियाणा यांचे X अकाउंट

ओडिशाचे मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी यांचे X अकाउंट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे X अकाउंट

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India