बिमस्टेक (बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालच्या उपसागराचा पुढाकार) सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्र भेट घेतली.
संपर्क, ऊर्जा, व्यापार, आरोग्य, कृषी, विज्ञान, सुरक्षा आणि लोकांचा लोकांशी संवाद यासह विविध क्षेत्रांत प्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या गटाशी फलदायी चर्चा केली. आर्थिक आणि सामाजिक वाढीचे इंजिन म्हणून बिमस्टेकच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला.
शांततापूर्ण, समृद्ध, लवचिक आणि सुरक्षित बिमस्टेक क्षेत्रासाठी भारताच्या वचनबद्धतेची त्यांनी ग्वाही दिली. भारताची नेबरहुड फर्स्ट आणि लुक ईस्ट ही धोरणे तसेच सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासासाठीच्या सागर व्हिजनमध्ये त्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सप्टेंबरमध्ये थायलंड येथे होणाऱ्या आगामी बिमस्टेक शिखर परिषदेला भारताचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
Glad to meet BIMSTEC Foreign Ministers. Discussed ways to strengthen regional cooperation, including connectivity, energy, trade, health, agriculture, science, security and people-to-people exchanges. Conveyed full support to Thailand for a successful Summit.@BimstecInDhaka pic.twitter.com/fJ9yvtYyXE
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2024