- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो येथे कॉप 26 जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली.
- कॉप 26 चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आणि हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि अनुकूलनासाठी जागतिक कृतीसाठी वैयक्तिक नेतृत्वाबद्दल पंतप्रधान जॉन्सन यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. आयएसए आणि सीडीआरआय अंतर्गत संयुक्त उपक्रमांसह हवामान संबंधी वित्तसहाय्य , तंत्रज्ञान, नवसंशोधन आणि अनुकूलन, ग्रीन हायड्रोजन, नवीकरणीय आणि स्वच्छ तंत्रज्ञानबाबत ब्रिटनबरोबर एकत्रितपणे काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
- दोन्ही पंतप्रधानांनी रोडमॅप 2030 च्या प्राधान्यक्रमाच्या विशेषत: व्यापार आणि अर्थव्यवस्था, जनतेमधील परस्पर संबंध , आरोग्य, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील प्राधान्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. एफटीए वाटाघाटी सुरू करण्याच्या दिशेने उचललेल्या पावलांसह वाढीव व्यापार भागीदारीतील प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
- दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तान, दहशतवादाचा बीमोड , हिंद प्रशांत क्षेत्र , पुरवठा साखळी लवचिकता आणि कोविड नंतरचा जागतिक आर्थिक विकास यासह प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांवरही चर्चा केली.
- पंतप्रधान जॉन्सन यांचे लवकरच भारतात स्वागत करण्याच्या इच्छेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.